गायत्री राळेभात यांची PSI पदी निवड झाल्याबद्दल जावेद हबीब सलून पार्लर यांच्या वतीने सत्कार.
नक्कीच PSI गायत्री राळेभात यांच्या मार्गदर्शनाने विशेषतः सर्व मुलींना फायदा होईल – सौ.मयुरी प्रवीण शिलवंत व सौ.मीरा विजय डोंगरे
जामखेड प्रतिनिधी –
३ जानेवारी २०२४ रोजी जावेद हबीब पार्लर सलूनच्या दोन्ही संचालिका सौ.मयुरी प्रवीण शिलवंत व सौ.मीरा विजय डोंगरे यांच्या वाढदिवसानिमित्त PSI गायत्री राळेभात यांचा सत्कार गुणगौरव करण्यात आला. यावेळी PSI गायत्री राळेभात यांनी आलेल्या सर्वाना विशेष मार्गदर्शन केले व आपण कश्या प्रकारे या पदापर्यंत पोहोचलो याविषयी माहिती दिली.
त्यानंतर बोलताना सौ.मयुरी प्रवीण शिलवंत म्हणाल्या कि आपण म्हणतो आजच्या युगात एका यशस्वी पुरुषामागे स्रीचा हात असतो पण आता यशस्वी स्रीच्या बरोबर एक पुरुषही ठामपणे उभा असल्यास स्री आसमान काबीज करू शकते. लग्न झाल्यानंतरही सर्व जबाबदारी पार पडून एवढे यश संपादन केल्याबद्दल सौ.मीरा विजय डोंगरे व जावेद हबीब परिवारातर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
यावेळी सत्काराला उत्तर देताना गायत्री राळेभात यांनी सौ.मयुरी शिलवंत, सौ.मीरा डोंगरे, जावेद हबीब परिवार व आलेल्या माता भगिनी यांचे आभार मानले.
गायत्री राळेभात पुढे बोलताना म्हणाल्य माझ्या यशामध्ये माझे पती, दीर सासू सासरे, आई वडील व सर्व जामखेडकरांचा आशीर्वाद असल्यामुळे व माझ्या मेहनतीचे फळ मला मिळाले आहे आणि गोरगरिबांची सेवा निःस्वार्थ पणे करिन असे मत व्यक्त केले.
माझ्या यशामध्ये माझा सर्व परिवार असल्याने मला यश मिळाले आहे आणि जामखेडच्या युवा मुलींना मी निस्वार्थपणे मदत व मार्गदर्शन करेल असे मत व्यक्त केले.