मा.आ.प्रा.राम शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त, मा.अजयदादा काशिद यांच्या वतीने सारोळा गावात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन…!
जामखेड(प्रतिनिधी)-
मा.आ.प्रा.राम शिंदे साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत,सारोळा गावात सर्व रोग निदान शिबीर व मोफत औषधोपचार या सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन भाजपा तालुका अध्यक्ष मा.श्री.अजयदादा काशिद यांच्या वतीने दि.3 जानेवारी 2024 रोजी करण्यात आले होते.सदर शिबीराचा 350 गरजू ग्रामस्थांनी लाभ घेतला.यावेळी समर्थ मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल येथील तज्ञ डॉक्टर टीम डॉ.भरत दारकुंडे,डॉ.अमोल भगत व डॉ.श्रीनिवास लांब (नागरगोजे) यांनी वैद्यकीय सेवा देण्याचे कर्तव्य बजावले.
मा.प्रा.श्री.राम शिंदे साहेब यांचा वाढदिवसानिमित्त सन्मान सौ.रितूताई व श्री.अजयदादा काशिद यांच्या वतीने करण्यात आला.तसेच सारोळा गावात गेल्या सात दिवसापासून सुरू असणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहास मा.राम शिंदे साहेब यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रम प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना,मा. श्री.राम शिंदे साहेब यांनी सारोळा गावाचे सरपंच श्री.अजयदादा काशिद यांच्या कार्यकाळातील झालेल्या विविध विकासकामांचे कौतुक केले.
अयोध्या येथील प्रभू श्रीरामचंद्र प्रतिष्ठापना दिन अर्थातच दि.22 जानेवारी 2024 हा दिवस सर्वांनी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात यावा असे अहवान केले.तसेच सारोळा गावाने अडचणीच्या काळात मला भरभक्कम आधार व पाठींबा दिला.त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचा आभारी आहे आणि सारोळा गावाच्या भविष्यातील सर्वांगीण विकासासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचा आशावाद यावेळी प्रा.राम शिंदे साहेब यांनी व्यक्त केला.
या वेळी अयोध्या येथे गेलेल्या सारोळा गावातील 30 कारसेवकांचा मा.प्रा.राम शिंदे साहेब यांच्या हस्ते प्रभु श्रीरामचंद्राची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला.या कार्यक्रम प्रसंगी सारोळा गावातील महिला भगिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.