घरापेक्षाही स्वच्छ व सुंदर नानेवाडीची शाळा , शैक्षणिक गुणवत्तेत नंबर वन :- गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे…

जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील मोहा गांवची डोगराच्या कुशीत वसलेली छोटीशी वाडी म्हणजे नानेवाडी . यावाडीत इयत्ता ४ थी पर्यंत जिल्हा परिषद शाळा आहे . ही शाळा आपल्या घरापेक्षाही स्वच्छ व सुंदर असून या शाळेची शैक्षणिक गुणवत्ता उत्कृष्ठ आहे या शाळेचा व शिक्षकांचा सर्व तालुक्यातील शिक्षक , अधिकारी ,पदाधिकारी , ग्रामस्थ यांना अभिमान असून ते निश्चितच प्रेरणादायी काम करत आहे ही आनंदाची बाब असल्याचे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी केले आहे .

या शाळेच्या आवारात सुंदर झाडी आहे . शाळेला दोन वर्ग खोल्या असून मुख्याध्यापक कार्यालय आहे . वर्गखोल्या चे बाधकाम उत्कृष्ठ दर्जाचे असून दरवाजे, खिडक्या ‘ सुंदर आहेत .छताला पी ओ.पी. असून व्हारांड्यात व वर्गात उत्कृष्ट दर्जाची फरशी आहे. वर्गात एल्. ई. डी. , प्रिटर , आरसा , ग्रंथालय , शैक्षणिक साहित्य मोठ्या प्रमाणावर आहे . मुलामुलींचे स्वच्छ शौचालय आहे .

वॉश बेसिन आहे . शाळेच्या छतावर पिण्याच्या पाण्याची टाकी असून , सोलर बसविण्यात आला आहे. त्यातून शाळेची दैनंदिन विजेची गरज भागविली जाते .

या शाळेची गुणवत्ता उत्कृष्ट असून सर्व मुलांचे मराठी , इंग्रजी शुद्ध लेखन चांगले असून गणित विषयासह सर्वच विषयाची विद्यार्थी यांची तयारी चांगली आहे . शाळेत वेगवेगळे सहशालेय उपक्रम राबविले जातात . या शाळेत श्री व सौ घोलप हे पती – पत्नी शिक्षक म्हणून काम करीत असून ते अतिषय मेहनती व कष्टाळू आहे . समाज सहभागातून त्यांनी सुंदर अशी शाळा बनविली आहे. लवकरच या शाळेवर बीट संमेलन घेऊन इतर शिक्षकांनाही निश्चितच प्रेरणा मिळणार आहे. या शाळेतील विद्यार्थी , शिक्षक ‘ ग्रामस्थ यांचे तालुक्यात सर्वत्र कौतूक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *