*जामखेड तालुक्याचे कार्यक्षम गटशिक्षणाधिकारी मा.श्री. बाळासाहेब धनवे यांच्या प्रेरणेने..…..*

*दत्तवाडी शाळेत हळदी-कुंकू समारंभ,लकी ड्राॅ ,गुणवंतांचा गौरव व महिला मेळावा उत्साहात संपन्न*

*पार्वती इनामदार यांचा ‘आदर्श माता’ पुरस्काराने गौरव*

जामखेड प्रतिनिधी :

महाराष्ट्र शासनाच्या ‘लेक शिकवा’ अभियानांतर्गत आदर्श माता पुरस्कार प्रदान सोहळा,महिला मेळावा,लकी ड्राॅ सोडत ,गुणवंतांचा गौरव व हळदी-कुंकू समारंभ तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा दत्तवाडी (धोंडपारगाव) येथे सोमवार दि.११मार्च २०२४ रोजी उत्साहात संपन्न झाला.जागतिक महिला दिनी प्रेरणादायी जीवन असलेल्या महिलांना पुरस्कार प्रदान करून त्यांचा गौरव करण्याची परंपरा मागील अकरा वर्षांपासून सातत्याने चालू असून यावर्षी ७५व्या( अमृतमहोत्सवी) वर्षात पदार्पण केल्याचे औचित्य साधून श्रीम.पार्वती विश्वनाथ इनामदार यांना शाळेच्या वतीने गौरविण्यात आले.

कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून जामखेड तालुका बाल विकास प्रकल्प अधिकारी मा.श्रीम.ज्योती बेल्हेकर व ‘गोष्ट विश्वविक्रमाची’ या पुस्तकाच्या लेखिका मा.सौ.ज्योती नागरगोजे उपस्थित होत्या.उद्घाटक म्हणून धोंडपारगावच्या सरपंच मा. सौ.अर्चना बळीराम शिंदे तर अध्यक्षस्थानी शालेय शिक्षणतज्ज्ञ सौ.राणी सुशिलकुमार धुमाळ होत्या.दत्तवाडी शाळेच्या मुख्या.मा.सौ.शितल काळे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला व सर्वांचे स्वागत केले.

यावेळी ऊसतोडणी कामगारांच्या जीवनसंघर्षावर आधारित असलेल्या ‘पाचाट’ या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक मा.श्री.परशुराम नागरगोजे यांनी ‘उत्साहमूर्ती:इनामदारताई’ या लेखाचे अप्रतिम अभिवाचन केले,तर कु.सई आप्पासाहेब साळवे या इ.३रीच्या विद्यार्थीनीने मानपत्राचे वाचन केले.

यानंतर महिलांचा हळदी-कुंकू समारंभ,संगीत खुर्ची खेळ,उखाणे व भव्य लकी ड्राॅ सोडत करण्यात आली .लकी ड्राॅचे प्रथम बक्षीस (आकर्षक पैठणी) मा.सौ.राणी सुशिलकुमार धुमाळ,द्वितीय बक्षीस (मिक्सर) मा.सौ.जयश्री राधाकृष्ण लाड तर तृतीय बक्षीस (कुकर) मा. सौ.मनीषा विक्रम शिंदे यांनी जिंकले,तर संगीत खुर्ची खेळात ज्येष्ठ नागरिक गटातून मा.सौ.काशीबाई गहिनीनाथ शिंदे व महिलांच्या गटातून मा. सौ.स्वाती हरिश्चंद्र साळवे यांनी प्रथम क्रमांक मिळवला. यावेळी सर्व महिलांनी उखाणे घेतले.

विविध गुणदर्शन स्पर्धेत जिल्हास्तरावर वक्तृत्व व गोष्ट सादरीकरण स्पर्धेत यश मिळवून शाळेचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल चि. शंभूराज विकास शिंदे व कु.सई लक्ष्मण झांजे या विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान केला.यावेळी इ.२री ते ५वीच्या विद्यार्थीनींनी ‘देश रंगिला’ या देशभक्तिपर गीतावर केलेले अप्रतिम नृत्य सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरला.

दत्तवाडी शाळा ही प्रेरणादायी उपक्रमांची प्रयोगशाळा असून येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्तेसाठी सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात असल्याचे गौरवोद्गार जामखेड तालुका बालविकास प्रकल्प अधिकारी मा. श्रीम.ज्योती बेल्हेकर यांनी काढले,तर सलग अकरा वर्षांपासून ‘लेक शिकवा’ अभियानांतर्गत शाळेच्या वतीने आदर्श माता पुरस्कार व भव्य महिला मेळाव्यांचे सातत्याने यशस्वी आयोजन करत असल्याबद्दल तालुक्याचे कार्यक्षम गटशिक्षणाधिकारी मा.श्री.बाळासाहेब धनवे यांनी शाळेतील सर्व शिक्षकवृंद ,शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षणप्रेमी दानशूर ग्रामस्थ यांचे विशेष अभिनंदन केले.


कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा.श्री.सुशिलकुमार धुमाळ,उपाध्यक्ष मा.श्री.दिपक शिंदे ,माजी अध्यक्ष मा.श्री.बळीराम शिंदे,माजी उपाध्यक्ष मा.श्री.मारूती सराफ यांच्यासह सर्व माता पालक सदस्यांनी विशेष प्रयत्न केले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन दत्तवाडी शाळेचे उपक्रमशील शिक्षक मा.श्री.हरिदास पावणे यांनी केले,तर बावी येथील प्रसिद्ध निवेदक श्री.हनुमंत निकम यांनी बहारदार सूत्रसंचालन केले.कार्यक्रमानंतर दत्तवाडी शाळेचे माजी मुख्याध्यापक व सध्या बांधखडक येथे कार्यरत असलेले आदर्श शिक्षक श्री.मनोहर इनामदार यांचेतर्फे सर्वांना मिष्टान्नभोजन देण्यात आले.कार्यक्रमास धोंडपारगाव पंचक्रोशीतील शिक्षणप्रेमी नागरिक,महिला तसेच बांधखडक येथील पालकांची लक्षणीय उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *