*जिल्हा सहकारी बँकेच्या वतीने जामखेड तालुक्यातील नोटरी अधिकाऱ्यांचा सन्मान*

जामखेड प्रतिनिधी,

भारत सरकार नोटरी अधिकारी म्हणून जामखेड तालुक्यातील ९ वकिलांची नियुक्ती केली असून त्यामध्ये ॲड.प्रमोद राऊत, ॲड.प्रवीण सानप, ॲड.प्रसाद गोले, ॲड.गणेश पाटील, ॲड.संग्राम पोले, ॲड.अमर कोरे, ॲड.भगवान जायभाय, ॲड.दिलीप वारे, ॲड.शाहूराव वाळुंजकर यांचा समावेश असून त्यांचा अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक मा.श्री अमोल दादा राळेभात यांच्या वतीने जामखेड शाखा सभागृहात सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना जिल्हा बँक संचालक श्री. अमोल दादा राळेभात यांनी जामखेड तालुक्यामध्ये पूर्वी २ नोटरी अधिकारी कार्यरत असल्यामुळे जामखेड तालुक्यात ग्रामीण भागातून येणाऱ्या खास करून अडाणी लोकांना नोटरीची कामे करण्यास अडचणी येवून नागरिकांची खूप मोठी गैरसोय होत होती.

परंतु भारत सरकारकडून जामखेड तालुक्यासाठी ९ नोटरी अधिकाऱ्यांची नियुक्ती झाल्यामुळे जनतेची गैरसोय न होता सर्वसामान्य जनतेची कामे लवकर मार्गी लागतील. तसेच निवड झालेले सर्व वकील हे होतकरू असून त्यांनी जामखेडमध्ये याआधीही कायद्याबाबत चांगल्या प्रकारे जनजागृती केलेली आहे. त्यामुळे ते नक्कीच सर्वसामान्यांना चांगल्या प्रकारे सेवा देतील अशी अपेक्षा व्यक्त करून नवनियुक्त नोटरी अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी नियुक्त वकिलाच्या वतीने ॲड.प्रवीण सानप यांनी आम्हां सर्वांचा यथोचित सन्मान केला त्याबद्दल संचालक साहेब यांचे आभार मानले तसेच आम्ही सर्व नवनियुक्त नोटरी अधिकारी म्हणून काम करताना सर्वसामान्य, गोरगरीब, अडाणी लोकांची गैरसोय, पिळवणूक होणार नाही याची नक्कीच काळजी घेवून त्यांना कायद्याच्या नियमानुसार योग्य व तत्पर सेवा देऊ, अशी ग्वाही दिली आणि

जामखेड तालुक्यामध्ये हा आमचा पहिलाच सन्मान झाला असल्याची भावना देखील व्यक्त केली.
या कार्यक्रमासाठी कृषि उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट सर, ॲड.नागरगोजे वकील, भारत काकडे, महादेव डिसले, गजानन शिंदे, नितीन सपकाळ, हरिदास काळदातेसह अनेक मान्यवर हजर होते.

यावेळी कृषि उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट सर यांनी प्रास्ताविक केले तसेच सहकारी सोसायटीचे तालुका सचिव श्री नितीन सपकाळ यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *