रयत श्री नागेश विद्यालय संकुला तर्फे पद्मविभूषण खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्पर्धा व वृक्षारोपण उपक्रम संपन्न.

खा शरद पवार साहेबांचे कार्य उत्तुंग आहे.- सुरेश भोसले

जामखेड प्रतिनिधी

रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषिमंत्री खा शरद पवार साहेबांचे कार्य उत्तुंग आहे.ते समाजकारणाचा वसा घेतलेले योद्धे आहेत. त्यांनी सर्व क्षेत्रांमध्ये कार्य केले आहे .त्यांचे नेतृत्व कर्तृत्व सर्वश्रेष्ठ आहे .सामाजिक राजकीय, क्रीडा ,शैक्षणिक, उद्योग, शेती साहित्य ,विविध क्षेत्रांमध्ये पवार साहेबांनी आपले योगदान दिलेले आहे. म्हणूनच आपण या थोर नेत्याचे नाव देशामध्ये सन्मानाने घेत असतो. असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालयांमध्ये पद्मविभूषण खा शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये सुरेश भोसले यांनी केले

रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालय व कन्या विद्यालय संकुल मध्ये देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री व रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पद्मविभूषण खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांचा वाढदिवस उत्साहात साजरा झाला आहे यावेळी वृक्षारोपण ,निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, विविध स्पर्धा व उपक्रम घेण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष कन्या विद्यालय स्कूल कमिटी सुरेश भोसले होते तर प्रमुख उपस्थित नागेश विद्यालय स्कूल कमिटीचे सदस्य हरिभाऊ बेलेकर , राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजेंद्रजी कोठारी ,विनायक राऊत, कन्या विद्यालय स्कूल कमिटी सदस्य प्रकाश सदाफुले, प्राचार्य मडके बी के मुख्याध्यापिका चौधरी केडी पर्यवेक्षक संजय हजारे ,पर्यवेक्षक कोकाटे व्ही के, गुरुकुल प्रमुख संतोष ससाणे ,रघुनाथ मोहळकर, एनसीसी प्रमुख मयूर भोसले, प्रा विनोद सासवडकर, प्रा कैलास वायकर, संतोष सरसमकर, आदी मान्यवर उपस्थित होते.
सतरा महाराष्ट्र बटालियन एनसीसी अहमदनगर चे युनिट श्री नागेश विद्यालय एनसीसी कॅडेटनी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरुवात केली.

नागेश विद्यालय चे उपक्रमशील शिक्षक शिंदे बी एस यांना शरद पवार फेलोशिप मिळाल्याबद्दल विद्यालय सन्मान करण्यात आला.
यावेळी नागेश व कन्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी वकृत्व स्पर्धेत उत्कृष्ट भाषणे केली व वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

प्रा विनोद सासवडकर, अभंग मॅडम, संभाजी इंगळे,पोकळे सर यांनी पवार साहेबांच्या विविध पैलूंचे भाषणाद्वारे माहिती दिली.
नागेश विद्यालय स्कूल कमिटी सदस्य हरिभाऊ बेलेकर यांनी खा शरद पवार साहेब हे देशाचे महान नेते आहेत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्पर्धा विद्यालयाने घेतल्याबद्दल अभिनंदन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश भोसले यांनी मनोगतामध्ये पद्मविभूषण खासदार शरद पवार साहेबांचे कार्य
राजकारणाच्या पलीकडे सामाजिक कार्यात त्यांचे कार्य सर्वमान्य आहे. हे नेतृत्व विशिष्ट एका समाजासाठी नाही व्यक्तीसाठी नाही ते सर्वांसाठी आहे महाराष्ट्राची परंपरा पुरोगामी विचारसरणीचे आहे त्यामध्ये अग्रगण्य नाव पवार साहेब यांचे आहे .रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षणात सर्वसामान्य पुढे नेले जाते व सामान्यांसाठी कार्य करणारे नेतृत्व म्हणजे पवार साहेब असे मनोगत व्यक्त करून खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रीमती मनीषा म्हस्के मॅडम व स्वाती अभंग यांनी केले तर आभार प्रदर्शन शंभूलाल बडे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *