*वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शालेय पोषण आहार मोर्चाला पाठिंबा अॅड.डॉ.अरुण (आबा ) जाधव*
जामखेड प्रतिनिधी,
जामखेड येथे श्रमिक मजदूर संघ या संघटनेच्या वतीने आज जामखेड येथे एस.टी. स्टाँड येथून हा मोर्चा काढण्यात आला. तहसील येथे हा मोर्चा धडकला त्या वेळी जामखेड व खेड्या पाड्यातून महिला वर्ग आलेला होत्या त्या वेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शालेय पोषण आहार मोर्चाला पाठिंबा अॅड.डॉ.अरुण (आबा ) जाधव यांनी पाठिबा दिला.
शाळेमध्ये आहार शिजवणार्या महिलाच्या वेथा मांडल्या व म्हणाले आहार शिजवणाऱ्या महिलांना ८३ रुपये रोजंदारी मिळते. व ह्या गरीब निराधार महिला त्या ८३ रुपये मध्ये सर्व काम करतात सकाळी ७ वाजता उठून कामाला सुरुवात करतात आणि तीन – चार वाजे पर्यंत सर्व कामे करतात त्या मध्ये वर्ग झाडून घेणे, शाळेचा परिसर स्वछ पर्यंत काम करतात. आणि शासन त्यांना देतात फक्त ८३ रुपये त्यावेळी खंत व्यक्त केले.
भारतात सर्वात कमी मानधनावर काम करणा-या स्वयंपाकी व मदतनीस यांची राज्यात व देशात एखादी आपण शाळेमध्ये शालेय पोषण आहार योजने अंतर्गत काम करणारे कर्मचारी संघटीत नसल्यामुळे आपल्या समस्या तशाच राहिल्या आहेत. आज आपण संघटीत झालो आहे.
त्यामुळे आता आपल्याला आपल्या हक्कासाठी संघर्ष करावा लागणार आहे. आपल्या प्रमुख मागण्यांसाठी आपण हा संघर्ष मोर्चा आयोजित केला असून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या मागण्याना व या मोर्चाला पाठींबा देण्यात आला.
त्यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य समन्वयक मा.ॲड.डॉ.अरुण (आबा ) जाधव, वंचित बहुजन आघाडीचे ता.अध्यक्ष मा.अतिश पारवे,लोकाधिकार संघटनेचे ता.अध्यक्ष विशाल पवार , द्वारका पवार ,म. राज्य समन्वयक सदस्य मा.कैलास पवार उत्तम गायकवाड म. राज्य समन्वयक सदस्य, शितल दळवी,अब्दुल तांबोळी, वैजिनाथ केसकर माय लेकरू प्रकल्प चे राजू शिंदे, ऋषिकेश गायकवाड,राणी टकले,योगिता मेघडंबर,आशा गव्हाणे,राणी भोरे,सारिका साठे, सुनिता नादने,वैशाली मुंडे,राणि टकले, अश्विनी दळवी,मिरा ढगेअमर्माता श्रीधर सगे रुपाली ,मीना सुरवसे,जिजाबाई पोते,कौशल्या मोहळकर लक्ष्मी माने, सारिका साठे,मनिषा सुतार,मुकुंद खुलारे सावित्री चौधरी,रुपाली काळे, रोहिणी क्षिरसागर, आदी महिला पुरुष उपस्थित होते.
त्या वेळी या मोर्चा च्या प्रमुख मागण्या *१.केंद्र सरकारच्या किमान वेतन कायद्याप्रमाणे किमान वेतन रू. १५०००/- इतके मिळाले पाहिजे.२. शासन नियमाप्रमाणे शासकीय सेवेत सामावुन घ्या.३. ज्या शाळेमध्ये आहार शिजविण्याचे भांडे कमकुवत झाली आहेत तेथे नविन भांडी द्यावीत.४. इतर केडरप्रमाणे स्वयंपाकी व मदतनीस यांना २० लाख रुपयाचे विमा संरक्षण मिळाले पाहिजे.५. इतर आस्थापनेप्रमाणे पुरेशा युनिफॉर्म मिळावा, ६. कोणत्याही कर्मचाऱ्याला विनाकारण कामावरून काढण्यात येऊ नये. ७. स्टॉम्प करारनामा रद्द करण्यात यावे.* या मागण्यासाठी तहसील येथे मोर्चा काढण्यात आला.