खर्डा ते धाकटी पंढरी (धनेगाव) महिलांसाठी व जेष्ठ नागरिकांसाठी मोफत बस सेवा, प्रा. सचिन सर गायवळ यांची अशीही विठ्ठल सेवा
नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले पुणे जिल्हा बास्केटबॉल संघटनेचे सचिव प्रा. सचिन सर गायवळ यांची खर्डा व परिसरातील विठ्ठल भक्त महिलांना अनोखी विठ्ठल सेवा अनुभवाला मिळत आहे.
उद्या दि. २९ जून रोजी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर प्रमाणेच जामखेड तालुक्यातील धाकटी पंढरी धनेगाव येथे यात्रा उत्सव सोहळा पार पडतो. ज्यांना पंढरपूरला जाता येणार नाही अश्या खर्डा व खर्डा परिसरातील महिलांना पुणे जिल्हा बास्केटबॉल संघटनेचे सचिव प्रा. सचिन सर गायवळ यांनी
गुरुवार दि. २९ जुन २०२३ रोजी सकाळी.९ ते सायं.६ पर्यंत मोफत बससेवा उपलब्ध करून दिली आहे.
तरी महिलांनी धनेगाव येथे जाऊन पांडूरंग सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रा. सचिन सर गायवळ यांनी केले आहे.