राज्यभरातील गटप्रवर्तक व अशा स्वंसेविकां बेमुदत संपाचा इशारा
ऑनलाईन कामावर टाकला आहे बहिष्कार.

जामखेड प्रतिनिधी,

प्रशासनाला मागण्यांचे देण्यात आले आहे निवेदन.
अरोग्य विभागाचा कणा म्हणून ज्यांची ओळख आहे राष्ट्रीय अरोग्य अभियानांतर्गत राज्यात शहरी व ग्रामीण भागात वाडी वस्ती पर्यंत सत्तर हजार अशा स्वंसेविकां व तीन हजार पाचशे गटप्रवर्तक आरोग्य सेवा देत आहेत
कोरोना काळातर आपला जीव धोक्यात घालून कोरोना रुग्णांना अरोग्य सेवा दिली परंतु शासनाने त्यांच्या सेवेची दखल घेतली नाही त्यामुळेच महाराष्ट्र राज्य अशा गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या वतीने संपाची हाक दिली गेली आहे.

आशा स्वंयसेविकांना कामावर आधारीत मोबदला मिळतो. आशा स्वयंसेविका या आरोग्याचे महत्वाचे काम करीत असुन त्या आरोग्य विभागाचा कणा आहेत. शासनाच्या वतीने आरोग्याच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यात आशा स्वंयसेविकांचा मोलाचा वाटा आहे.

महाराष्ट्रात २००५ मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानाची सुरुवात झाली. तेव्हा कमी शैक्षणीक पात्रता असलेल्या साधारणतः सहावी, सातवी, आठवी, नववी, दहावी पास असलेल्या महिलांना आशा स्वयंसेविका पदी नियुक्ती देण्यात आली. त्यांना इंग्रजी सफाईदारपणे लिहिता व वाचता येत नाही. परंतु आरोग्य विभागाकडुन आशा स्वंयसेविकांना बहुतांश इंग्रजीत असलेल्या अॅपवर खालील कामे ऑनलाईन करण्याची सक्ती केली जात आहे.

(PMMVY) प्रधान मंत्री मातृ वंदना योजना २.० अंतर्गत लाभार्थ्याचे फॉर्म ऑनलाईन भरणे.
लसीकरणांतर्गत सर्व सत्रे व मिशन इंद्रधनुष्य ५.० अंतर्गत येणाऱ्या अतिरिक्त सत्रां दरम्यान
आरोग्यसेविका लाभार्थ्याला लस देत असताना
U Win Portal वर Real Time Data Entry करणे.हे काम गटप्रवर्तकांनाही सांगण्यात येत आहे. सदर अॅप हे वैदयकीय क्षेत्राशी निगडीत असलेल्या इंग्रजी भाषेत असल्यामुळे आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांना समजण्यास कठीण आहे. आयुष्यमान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजने (PMJAY) अंतर्गत पात्र लाभार्थ्यांची ई-केवायसी करणे.
आभा आयडी कार्ड (ABHA ID Card) काढून ते केंद्र शासनाच्या विविध आरोग्य पोर्टलवर फिडिंग करणे.
NCD अंतर्गत C-back form ऑनलाईन भरणे

अशी स्मार्ट फोनशी संबंधीत ऑनलाईन कामे आशा स्वयंसेविकांना सांगण्यात येत आहेत. त्याकरीता प्रत्येक आशांना युजर आयडी व पासवर्ड देण्यात आलेला आहे. पुरविलेल्या युजर आयडी व पासवर्डच्या सहाय्याने अॅपमध्ये कामे करण्याची सक्ती आशांना केली जात आहे. शासकीय आरोग्य संस्थेत सुरक्षित प्रसुती करुन मातामृत्यु व बालमृत्युला आळा घालण्यासाठी आशा
स्वयंसेविकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच ७२ हेडखाली आशांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील जनतेला सेवा पुरवावी लागते. त्यांना कामावर आधारीत मोबदला दिला जातो. दुर्गम व अतिदुर्गम भागात नेट कनेक्टीव्हीटी सहजपणे उपलब्ध नसते. त्यामुळे ऑनलाईन कामे करण्यामध्ये आशा स्वयंसेविकांचा बराचसा वेळ वाया जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचा विपरीत परिणाम त्यांच्या मुळ कामावर होवुन परीणामी त्यांना मोबदला कमी मिळाल्यामुळे त्यांचे न भरुन निघणारे नुकसान होऊ शकते. ऑनलाईन कामावर

बहिष्कार टाकूनसुदधा आशांना ऑनलाईनची कामे करण्यासाठी दडपशाही केली जात असल्याच्या भावना निवेदनात व्यक्त केल्या तसेच
आशा स्वंयसेविकांना कोणत्याही प्रकारचे ऑन लाईन कामे सांगण्यात येवु नये.

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना दर वर्षी दिवाळीपूर्वी एका महिन्याच्या मोबदल्याएवढा बोनस देण्यात यावा.
ऑक्टोबर २०१८ नंतर केंद्र शासनाने आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात वाढ केलेलीनाही केंद्र शासनाकडुन मोबदल्यात वाढ मिळवून देण्यात यावी

आशा स्वंयसेविकांना किमान वेतन लागू करावे वरील प्रश्न सोडवण्यासाठी कृति समितीला चर्चेसाठी वेळ देण्यात यावा. दि. १५/१०/२०२३ पुर्वी प्रश्न सोडवावेत. अन्यथा दि.१६/ १० / २०२३ पासून राज्यातील ७० हजार आशा स्वयंसेविका काम बंद करुन संपावर जातील तसेच ४ हजार गटप्रवर्तकसुदधा त्यात सहभागी होणार आहेत . दि. ०३/१०/२०२३ पासुन राज्यभर जिल्हास्तरावर धरणे आंदोलन व मोर्चे काढण्यात येतील. होणाऱ्या परीणामास शासनाची सर्वस्वी जबाबदार राहील व याची नोंद शासनाने घ्यावी ही विनंती
अशा अशयाचे निवेदन जामखेड तालुका अरोग्य अधिकारी,गटविकास अधिकारी, आ. रोहित पवार यांच्या कार्यालयात देण्यात आले आहे
यावेळी गटप्रवर्तक नंदा शिंदे सुवर्णा हजारे नंदा वाघमारे शांती शिरोळे शिंगाणे एम. पी. तसेच अशा स्वंसेविकां मनिषा काटकर शिल्पा पारवे संगिता नाईक सारिका कांबळे कौशल्या राऊत माधुरी बेलदार अलका सुर्यवंशी या महिला उपस्थित होत्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *