हाच तो लाचखोर बाह्यस्रोत वायरमन संतोष अष्टेकर पैसे स्विकारताना रंगेहाथ पकडला…

लाचेची मागणी पुन्हा पुन्हा करत असल्याने शिंदे यांनी रचला सापळा !

जामखेड प्रतिनिधी

बांधकाम करताना धोका होऊ नये म्हणून तात्पुरती लाईट बंद करण्यासाठी दोन हजारांची लाच घेताना विज वितरणचा बाह्यस्रोत वायरमन लाचलुचपत विभागाच्या सापळ्यात आडकला आहे. त्यामुळे जामखेड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या बाबत सविस्तर असे की यातील ४५ वर्षीय तक्रारदार पुरुष रा- वराट हॉस्पिटल शेजारी, खाडे नगर, जामखेड यांचे जामखेड शहरातील रामेश्वर नगर, जामखेड येथे घराचे बांधकाम चालू असून बांधकाम चालु असलेल्या प्लॉट समोर म.रा.वि.वि. कंपनीची विद्युत वहिनी असल्यामुळे विद्युत पुरवठा चालू असताना समोरील बाजूचे कामकाज करता येत नव्हते, त्यामुळे सुरक्षित रित्या बांधकाम करण्यासाठी विद्युत पुरवठा खंडित करणे आवश्यक होते, त्यामुळे यातील तक्रारदार यांनी त्यांच्या भागातील वायरमन आरोपी संतोष अष्टेकर यांना विद्युत पुरवठा खंडित करण्याबाबत विनंती केली असता त्यांनी यापूर्वी ४ वेळा विद्युत पुरवठा २ तासासाठी खंडीत करून दिला होता.

त्यासाठी ५०० रुपये घेतले होते. काल दि. १६ ऑक्टोबर रोजी ४ वेळा वीज खंडित करण्याचे प्रत्येक वेळी ५०० प्रमाणे यापूर्वी 4 वेळा वीज खंडित केलेबाबत काल दि रोजी ची 10.30 ते 12.30 यावेळात वीज खंडित करणेसाठी असे एकूण पाच वेळा वीज खंडित करण्याचे २५०० रूपये लाचचे मागणी करत असल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अहमदनगर यांचेकडे करण्यात आली होती. त्यानुसार काल दि. १७ रोजी रोजी पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली असता यातील आरोपी संतोष आष्टेकर याने प्रत्येक वेळी वीज खंडित करण्यासाठी ५०० ₹ प्रमाणे २५०० ₹ लाच मागणी करून २००० ₹ लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले. तसेच यापूर्वी ५००₹ लाच रक्कम स्वीकारल्याचे देखील मान्य केल्याचे पडताळणी कारवाईमध्ये निष्पन्न झाले.

सदर लाच रक्कम आरोपी लोकसेवक याने आज दि. १७ रोजी जामखेड येथे तक्रारदार यांच्या बांधकाम चालू असलेल्या प्लॉट समोरील DP जवळ आयोजित केलेल्या सापळा कारवाई दरम्यान पंचासमक्ष २००० ₹ लाच रक्कम स्वीकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. जामखेड पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी संतोष शांतीनाथ अष्टेकर (वय ४१ वर्ष) पद-बाह्यस्रोत वायरमन
म रा वि वि कंपनी, जामखेड सेक्शन, ता. जामखेड याचे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राच्यापोलीस अधीक्षिका श्रीमती शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, वाचक पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार, सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक शरद गोर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार पोलीस नाईक रमेश चौधरी, पोलीस काॅन्स्टेबल, बाबासाहेब कराड, सचिन सुद्रुक, चालक हेडकॉन्टेबल दशरथ लाड यांनी काम पाहिले. तर पर्यवेक्षण अधिकारी म्हणून पोलीस उप अधीक्षक प्रविण लोखंडे (ला.प्र.वि.) यांनी केली आहे.

चौकट..

जर कोणी शासकीय अधिकारी/कर्मचारी पैसेची मागणी करत असेल तर तात्काळ अँन्टी करप्शन ब्युरो, अहमदनगर, याच्याशी संपर्क साधावा.

फोन नं. – ०२४१- २४२३६७७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *