गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे ग्रेट व्यक्तिमत्व :- शिक्षक नेते श्री एकनाथ चव्हाण…

जामखेड :- आदरणीय गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे साहेब ग्रेट व्यक्तिमत्व आहे. असे प्रतिपादन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक व शिक्षकनेते श्री एकनाथ चव्हाण यांनी केले आहे .
त्यांच्याजवळ आपला तुपला, लांबचा जवळचा, जातीचा परजातीचा असला कसलाच भेदभाव नाही. जो काम करिन तो त्यांचा आवडता आणि त्याचेच कौतुक हि बाब खास निरिक्षणातून स्पष्ट झाली.दहा पंधरा दिवस पूर्वीची धनवेसाहेबांनीच सांगितलेली घटना आहे. आमचे मित्र आदर्श शिक्षक लहु बोराटे सरांचे ऑफिसमध्ये काही तरी कामे होते.कार्यलयीन वेळ संपून गेली होती.
आदरणीय गटशिक्षणाधिकारी धनवे साहेबांना नगरला जायचे होते. पण एक खास काम करणारा आमचा शिक्षक आणि त्यांच्या कामासाठी धनवे साहेब खासकरून थांबले. कालही आपण पाहिले असेल वरिष्ठ वेतनश्रेणीचे प्रस्ताव त्यांनी स्वतः बसून पूर्ण करून घेतले. गेल्या दहा वर्षापासून मी पहातो आहे.संघटनेला ऑफिसली काही कामच नाही.
आदरणीय पोपट काळे साहेब आदरणीय नागनाथ शिंदे साहेब,आदरणीय बाळासाहेब धनवेसाहेब आणि गट विकास अधिकारी आदरणीय प्रकाश पोळ साहेब हे सर्वच अधिकारी आणि यांची कामाची शैली त्यामुळे काम करणारे शिक्षक झोकून देवून काम करतात. आणि त्यांचे वेळोवेळी कौतुकही होते.मागे मेडिकल बील असो की कालचे वरिष्ठ वेतनश्रेणीचे प्रस्ताव असो, बाळासाहेब धनवे साहेब व प्रकाश पोळ साहेब यांनी जी दखल घेतली त्याबद्दल दोघांनाही मनापासून सलाम…
प्रकाश पोळ साहेब यांनी वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्ताव पूर्ण करण्याचे नियोजन लावले व बाळासाहेब धनवे साहेब यांनी तेथे बसून ते पूर्ण केले. ज्या शिक्षकांची नेमणुक केली ते आमचे मित्र ज्ञानेश्वर कोळेकर सर, अध्यक्ष नवनाथ बहिर सर, अमोल पवार सर, सागर माकुडे सर, प्रशांत कुंभार सर,भाऊसाहेब डिडूळ सर व बाळासाहेब गांगर्डे साहेब या आमच्या खास टिमचे खास अभिनंदन…मी अनेकदा शिक्षकांना परदेशात किती मान सन्मान आहे.
याच्या घटना वाचल्या, ऐकल्या. पण मी छातीठोक पणे सांगतो की माझ्या जामखेड तालुक्यात काम करणार्‍या शिक्षकाला 1000% मान आहे. सन्मान आहे. पोळ साहेब व धनवे साहेब दोघेही आमच्यासाठी ग्रेट आहेत.*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *