*मोदी आवास योजनेसाठी ओबीसी आणि एसबीसी प्रवर्गातील नागरिकांनी ग्रामपंचायतकडे अर्ज करावा.*

*जामखेड तालुक्यातील 203 लाभार्थ्यांना मिळणार घरकुल*

*ओबीसी/एसबीसी प्रवर्गातील नागरिकांना ग्रामपंचायत अर्ज करण्याची मुदत 22 ऑक्टोबर पर्यंत.*

*अर्जाचा नमुना ग्रामपंचायतमध्ये उपलब्ध*

*ग्रामपंचायत स्तरावर ओबीसी/एसबीसी प्रवर्गाची नवी यादी तयार करण्यासाठी प्रशासन सज्ज*

*जामखेड प्रतिनिधी

     किरण रेडे*

“सर्वासांठी घरे २०२४ हे राज्यशासनाचे धोरण असून, त्यानुसार राज्यातील बेघर तसेच कच्च्या घरात वास्तव्यास असणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना सन २०२४ पर्यंत स्वतःचे हक्काचे घर मिळावे असा प्रयत्न आहे. त्यानुसार राज्यात ग्रामीण भागातील बेघरांना घरकुल उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत विविध घरकुल योजना राबविण्यात येत आहेत. इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांकरीता राज्य शासनाच्या कोणत्याही योजना अस्तित्वात नाही. त्यामुळे इतर मागास प्रवर्गातील घरकुलास पात्र लाभार्थी घरकुलाच्या लाभापासून वंचित राहत आहेत. म्हणून राज्य शासनाने “मोदी आवास घरकुल योजना” राबविण्यास मंजुरी दिली आहे. सध्या मोदी आवास योजनेसाठी जामखेड तालुक्याला ओबीसी प्रवर्गासाठी 202 आणि एसबीसी प्रवर्गासाठी 1 लाभार्थ्यांचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे.

*या लाभार्थ्यांचा होणार समावेश-*
१. ड यादीतील OBC/SBC लाभार्थी
२. सिस्टीमद्वारे automatic रिजेक्ट झालेले परंतु पात्र असलेले SBC/OBC लाभार्थी
३. वरील दोन्ही व्यतिरिक्त बेघर अथवा कच्चे घर असणारे OBC/SBC लाभार्थी

*योजनेचे पात्रता निकष-*
१. लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील इतर मागास प्रवर्गातील असावा.

२. लाभार्थ्यांचे महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य किमान १५ वर्षे असावे.

३. लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न रु. १.२० लाखापेक्षा जास्त नसावे.

४. लाभार्थ्यांचे स्वत:च्या अथवा कुटुंबियांच्या मालकीचे राज्यात पक्के घर नसावे.

५. लाभार्थ्याकडे स्वत:ची अथवा शासनाने दिलेली जमीन असणे आवश्यक आहे अथवा त्याचे स्वतःचे कच्चे घर असलेल्या ठिकाणी घर बांधता येईल.

६. लाभार्थी कुटूंबाने महाराष्ट्र राज्यात अन्यत्र कोठेही शासनाच्या कोणत्याही गृहनिर्माण / गृहकर्ज योजनांचा लाभ घेतलेला नसावा.

७. एकदा लाभ घेतल्यानंतर लाभार्थी पुनःश्च योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहणार नाही.

८. लाभार्थी हा प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गतच्या कायमस्वरुपी प्रतिक्षा यादीमध्ये (PWL) समाविष्ट नसावा.

*आवश्यक कागदपत्रे-*
७/१२ उतारा / मालमत्ता नोंदपत्र / ग्रामपंचायतमधील मालमत्ता नोंदवहीतील उतारा अथवा  ग्रामपंचायत प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेल्या जातीच्या प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत, आधारकार्ड स्वेच्छेने दिलेल्या – आधारकार्डची प्रत, रेशनकार्ड / निवडणूक ओळखपत्र / विद्युत बिल / मनरेगा जॉब कार्ड लाभार्थ्याच्या स्वतःच्या नावे वापरात असलेल्या बचत खात्याच्या पासबुकची छायांकित प्रत.

*या लाभार्थ्यांना मिळणार प्राधान्य-*

अ. विधवा / परितक्त्या महिला, कुटुंब प्रमुख.

ब. पूरग्रस्त क्षेत्रामधील लाभार्थी अथवा पिडीत लाभार्थी.

क. जातीय दंगलीमुळे घराचे नुकसान (आग व इतर तोडफोड झालेली व्यक्ती.

ड. नैसर्गिक आपत्तीबाधित व्यक्ती

इ. दिव्यांग व्यक्ती

*चौकट-*
मोदी आवास घरकुल योजना ही ओबीसी आणि एसबीसी प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी असून ड यादीतील ओबीसी/एसबीसी लाभार्थी आणि सिस्टीमद्वारे reject झालेले ओबीसी/एसबीसी लाभार्थ्यांचा समावेश नवीन यादीत आपोआप होणार आहे. परंतु वरील दोन्ही यादीत नसणाऱ्या ओबीसी/एसबीसी लाभार्थ्यांनी या योजनेत नाव समाविष्ट करण्यासाठी ग्रामपंचायतकडे अर्ज करावा. अर्जाचा नमुना ग्रामपंचायतमध्ये उपलब्ध आहे. अर्ज करण्याची मुदत २२ ऑक्टोबरपर्यंत असेल.
*प्रकाश पोळ, गटविकास अधिकारी, जामखेड.*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *