*रमाई आवास योजनेअंतर्गत अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांनी पंचायत समितीला प्रस्ताव सादर करावे*
महाराष्ट्र शासनामार्फत अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांसाठी *रमाई आवास योजना* राबवली जात असून जामखेड तालुक्यासाठी *479* लाभार्थ्यांचे उद्दिष्ट प्राप्त आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांनी परिपूर्ण प्रस्ताव ग्रामपंचायत मार्फत पंचायत समिती जामखेड येथे सादर करावा. प्रथम येणाऱ्या प्रस्तावास प्राधान्य दिले जाईल.
*या योजनेसाठी खालील प्रमाणे-*
१. लाभार्थी अनुसूचित जातीचा असावा
२. लाभार्थी ग्रामपंचायत चा रहिवासी असावा
३. यापूर्वी कोणत्याही योजनेतून घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा
४. लाभार्थ्याचे उत्पन्न 1.20 लाख रुपये च्या आत असावे
५. घरकुल बांधण्यासाठी लाभार्थ्याकडे स्वतःची जागा असावी.
*या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत-*
१. घरकुल मागणी अर्ज
२. जातीचा दाखला (प्रांत यांचा)
३. रहिवासी दाखला
४. रेशन कार्ड
५. जॉब कार्ड
६. आधार कार्ड
७. बँक पासबुक
८. जागेचा उतारा
९. उत्पन्नाचा दाखला (तहसीलदार यांचा)
१०. लाभार्थी निवडीबाबत ग्रामसभा ठराव
११. ग्रामपंचायतचा कर थकीत नसल्याचे प्रमाणपत्र
१२. यापूर्वी कोणत्या योजनेतून सदर लाभार्थ्यास लाभ दिल्या नसल्याचे ग्रामसेवक यांचे प्रमाणपत्र
*-प्रकाश पोळ, गटविकास अधिकारी, पंचायत समिती जामखेड.*