मराठा समाजाच्या उपोषणावर लाठीचार्ज व गोळीबार केल्याच्या निषेधार्थ, जामखेड शहर 100% कडकडीत बंद…
व्यापारी व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
जामखेड प्रतिनिधी –
जामखेड बंद ची हाक दिली असता कालपासूनच एस टी डिपो बंद ठेवण्यात आले होते. इतर सेवा वगळता जामखेड शहर कडकडीत बंद दिसुन येत आहे. व्यापाऱ्यांनी व छोटे मोठे दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेऊन बंद ला मोठा प्रतिसाद दिला तसेच सकल मराठा समाजाच्या वतीने आम्ही शांततेच्या मार्गाने जामखेड बंद ठेवणार आहोत
याबाबत सकल मराठा समाजाच्या वतीने दि. 2 सप्टेंबर शनिवार रोजी जामखेड तहसिल कार्यलय येथे सकल मराठा समाजाच्या वतीने निषेध करण्यात आले होते व तहसीलदार साहेब यांना निवेदन दिले तसेच जामखेड बंदचे आवाहन करण्यात आले होते त्या आवाहनाला प्रतिसाद देत अत्यावश्यक सेवा वगळता जामखेडच्या व्यापाऱ्यांनी व छोटे मोठे दुकानदारांनी कडकडीत बंद ठेऊन सहकार्य केले.
तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंतरवाली सराटी, तालुका अंबड, जिल्हा जालना येथे उपोषणास बसलेले मनोज जरांगे या मराठा समाजातील तरुणावर व त्यांच्या सहकाऱ्यांवर या सरकारने व गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या गृह विभागाने अमानुषपणे मराठा समाजातील पुरुष, महिला व लहान मुलांवर लाठीचार्ज करून गोळीबार केल्याच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असून,अनेक शहरे, तालुके बंद ठेवण्यात आली आहेत. या संदर्भात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील व पोलीस कर्मचाऱ्यांनी जामखेड मध्ये चोख बंदोबस्त ठेवला होता.