*जामखेडचे शिक्षक लक्ष्मीकांत ईडलवार यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर*
*गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांच्याकडून ईडलवार यांचा सन्मान.*
लक्ष्मीकांत ईडलवार हे जामखेड तालुक्यातील एक प्रयोगशील शिक्षक असून नायगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अध्यापन करीत आहेत. त्यांनी राष्ट्रीय स्तरावर पाच शैक्षणिक निबंध/ प्रबंध व शैक्षणिक लेख राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झाले आहेत. शासनाच्या दीक्षा, एक भारत श्रेष्ठ भारत, समग्र शिक्षा इत्यादी पोर्टलवर त्यांचे व्हिडिओ प्रसिद्ध झाले आहेत. राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद पुणे निर्मित करूया मैत्री गणिताशी, इयत्ता चौथीच्या कार्यपुस्तकेच्या निर्मिती गटात त्यांनी सहभाग नोंदवलेला आहे.
तसेच राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद पुणे आयोजित शिकू आनंदे व इत्यादीमध्ये तज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांनी काम केलेले आहे. आजवर त्यांनी शाळेच्या विकासासाठी दहा लाखाच्यावर लोकसभागातून शाळेचा विकास व अध्यापन तंत्रज्ञान चा वापर केला आहे. राष्ट्रीय, राज्य व जिल्हा स्तरावर प्रशिक्षक, तज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांनी काम केले आहे.
*आदर्श शिक्षक लक्ष्मीकांत ईडलवार यांचे फिरते वाचनालय, पक्षांची खानावळ, दीक्षांत समारंभ इत्यादी उपक्रम खूप गाजले असून त्याचे अनुकरण इतर शाळातही होत आहे. जामखेड सारख्या ग्रामीण भागातील शिक्षकाला राज्यस्तरावरील गुणवत्ता पुरस्कार मिळणे ही आनंदाची गोष्ट आहे. अशा शिक्षकांच्या मेहनतीचे बक्षीस म्हणून पंचायत समितीच्या माध्यमातून मनरेगा योजनेतून त्यांच्या शाळेला वॉल कंपाउंडचे काम करण्यात आले आहे*
*-प्रकाश पोळ, गटविकास अधिकारी, जामखेड*
त्यांच्या या यशाबद्दल खा. सुजय दादा विखे, आ. रोहित दादा पवार, प्रा. आ. राम शिंदे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, माजी गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे, गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे, विस्तार अधिकारी बी के माने, सिद्धनाथ भजनावळे, सुनील मिसाळ, केंद्र प्रमुख व शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.