*जालन्यातील लाठीमार प्रकरणी जामखेड येथे सकल मराठाच्या वतीने निषेध व्यक्त*

*उदया जामखेड तालुका बंदची हाक*

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावातील मराठा समाजाचे आंदोलन उधळत मराठा आंदोलकांवर अमानुषपणे लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ जामखेड तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने आज शनिवार दि. २ सप्टेंबर रोजी सकाळी जामखेड तहसील कार्यालयासमोर आंदोलन करुन नायब तहसीलदार मनोज भोसेकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी उद्या रविवार दि ३ सप्टेंबर रोजी जामखेड तालुका बंदची देखील हाक देण्यात आली आहे.

जामखेड तहसील कार्यालयासमोर झालेल्या आंदोलना दरम्यान प्रा मधुकर (आबा) राळेभात, अण्णासाहेब सावंत, रमेश (दादा) आजबे ,दत्तात्रय वारे ,मंगेश (दादा) आजबे ,राहुल उगले ,कुंडल राळेभात ,पवन राळेभात यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त करताना सांगितले की महाराष्ट्रात मराठा समाज्याच्या आरक्षणासाठी ५८ मोर्चे शांततेत निघाले ते मोर्चे अतिशय शांततेच्या मार्गाने काढण्यात आले होते .मात्र पुन्हा ग्रामिण भागात आरक्षणासाठी आंदोलने होऊ नये म्हणून पोलीसांनी  त्या ठिकाणी मराठा उपोषण उधळून लावण्याच्या हिशोबाने मोठा फौजफाटा बोलविला होता. वरीष्ठ पातळीवरून आदेश आल्या शिवाय हा लाठीचार्ज झाला नाही .या लाठीचार्ज मध्ये लहान मुले ,वयोवृद्ध व माता भगिनींवर देखील हल्ला करण्यात आला.

सध्याच्या सरकार मध्ये शंभरच्यावर मराठा आमदार आहेत पण तरीदेखील मराठा आरक्षणाचा मार्ग सुटला नाही .राजकीय त्याग करुन मंत्री व आमदारांनी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला पाहिजे. आरक्षणाच्या माध्यमातून मराठा समाज्याच्या मुलांना शिक्षण मिळाले पाहिजे मराठ्यांच्या पोरांनी शेतीच करायची काय ? असा सवाल देखील सरकारला करण्यात आला. जालना जिल्ह्य़ातील अंतरवाली गावात पाचशे लोक उपोषणास बसले होते तर एक हजार पोलीसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला याचा अर्थ मराठा आंदोलन या सरकारला उधळणच लावायचे होते . मराठा समाज्याने आता गावातील मतभेद विसरुन समाज्यासाठी एकत्र आले पाहिजे. जो पर्यंत मराठा समाज खरा एकत्र येत नाही तो पर्यंत आरक्षणाचे घोंगडे भिजत रहाणार आहे . मराठा समाज्याच्या मुलांवर गुन्हे दाखल करुन त्यांना आडचणीत आणायचा प्रयत्न सध्या होत आहे.

अंतरवाली सराटी गावात जरांगे पाटील यांचा उपोषणाचा चौथा दिवस होता तब्येत खराब झाली म्हणून जरांगे यांना उठवण्यासाठी लाठीचार्ज केला मात्र २१ दिवसापर्यंत पाणी पीले नाही तरी कुठल्याही उपोषणकर्त्याला काही होत नाही मग जरांगे पाटलांना मेडिकल ला घेऊन जायची एवढी घाई कशासाठी केली याचे उत्तर सरकारने द्यावे. शेतकर्‍यांन बरोबरच मराठा समाज देखील कर्जबाजारी होत आहे. गरीब व सर्व सामान्य ज्यांनी लाठीचार्ज करण्याचा आदेश दिला त्या अधिकारी व सरकारचा आम्ही आज निषेध करतो. आता शांततेच्या मार्गाने आंदोलने नाहीतर आक्रोश मोर्चाने रस्त्यावर उतरावे लागेल असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे .

निवेदन देता वेळी मधुकर (आबा) राळेभात, दत्तात्रय वारे , मंगेश दादा आजबे, रमेश आजबे, अवदुत पवार, सुनील जगताप, मनोज भोरे, राहुल ऊगले, पवण राळेभात, गणेश गवसणे शरद शिंदे, तात्यासाहेब मुरूमकर, आप्पासाहेब कार्ले, विजय काशिद, अण्णा ढवळे, भरत राळेभात कुंडल राळेभात, महेश राळेभात, बाबासाहेब ठाकरे, प्रवीण ऊगले, सागर कोल्हे, शुभम राळेभात, विकास राळेभात, अमित जाधव, हरिभाऊ पठाडे, ऋषिकेश डुचे,
जयसिंग उगले, बजरंग मुळे, बाळासाहेब भोरे, तुकाराम ढोले, बंडु मुळे, संदीप गायकवाड, पप्पु काशीद, खैरे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

उद्या जामखेड तालुका बंदची हाक …

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावातील मराठा समाजाचे आंदोलन उधळत आंदोलकांवर अमानुषपणे लाठीचार्जच्या निषेधार्थ उद्या रविवार (दि.३) सप्टेंबर २०२३ रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने व मराठा क्रांती मोर्चाने जामखेड बंदची हाक दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *