जामखेड प्रतिनिधी

जामखेड शहरातील विद्देचे माहेर घर असणारे कालिका पोदार लर्न स्कुल येथे सर्वांची ओपन फ्री महिलांसाठी खास सेल्फ डिफेन्स वर्कशॉपचे आयोजन 29 एप्रिल रोजी सायंकाळी 5 ते 8या वेळेत कालिका पोदार लर्न स्कुल साकत फाटा जामखेड येथे या कार्यकर्माचे आयोजन करण्यात आले आहे.

 

या कार्यक्रमासाठी येण्याजाण्यासाठी खास बसेसची व्यवस्था कालिका पोदार लर्न स्कुल च्या वतीने करण्यात आलीयासाठी अगोदर नाव नोंदणी आवश्यक आहे नाव नोंदणीसाठी संपर्क क्रमांक -9697591414

या कार्यक्रमासाठी तपणेश्वर रोड, नगर रोड, पोलीस स्टेशनं रोड, बीड रोड येथून बसेस असणार आहेत त्यामुळे या फ्री सेल्फ डिफेन्स वर्कशॉपचा लाभ घ्यावा असे आवाहन स्कुलच्या वतीने करण्यात आले आहे.

 

औरंगाबाद येथील असणारे प्रसिद्ध फिटनेस ट्रेनर लक्ष्मीकांत खिची सर Zee अनन्य पुरस्काराने सन्मानित
*Multi Marshal Arts Specialist) यांचा
“Body Toning and Weight Loss Exercises” वर प्रदीर्घ अनुभव असणारे पोलीस भरती नेव्ही भरती, कराटे या मध्ये त्यांचे विध्यार्थी चमकले आहेत टे आता जामखेड येथील महिलांना सेल्फ डिफेन्स चे धडे देण्यासाठी येणार आहेत तेव्हा या कार्यक्रमात जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घ्यावा असे आवाहन स्कुलचे मुख्याध्यापक जोशी सर यांनी केले आहे

`आरोग्यम् धनसंपदा’ या प्रमाणे या धावपलीच्या जीवनात थोडा वेळ स्वतःसाठी काढण्याची गरज आहे

तेव्हा हे सेमिनार कालिका पोदार स्कुल येथे अवघे 3 तास असणार आहे तेव्हा जामखेड व जामखेड परिसरातील महिलांनी व मुलींनी या सेल्फ डिफेन्स वर्कशॉपचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *