सहकार महर्षी कै गोपाळराव (दादा) सोले पाटील विकास सेवा सोसायटी, आरणगावमध्ये सासू विरुद्ध सून सामना; ७ विरुद्ध ५ मतांनी सुवर्णाताई सोले पाटील यांचा ऐतिहासिक ठराव मंजूर

*सहकार महर्षी कै गोपाळराव (दादा) सोले पाटील विकास सेवा सोसायटी, आरणगावमध्ये सासू विरुद्ध सून सामना; ७ विरुद्ध ५ मतांनी सुवर्णाताई सोले पाटील यांचा ऐतिहासिक ठराव मंजूर*

आरणगाव | प्रतिनिधी

सहकार महर्षी गोपाळराव सोले पाटील विकास सेवा सोसायटी, आरणगाव येथे जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या ठरावात सासू विरुद्ध सून असा रंगतदार सामना पाहायला मिळाला.

या ठरावात पांडुरंग गोपाळराव सोले पाटील यांच्या सुनबाई उमेदवारास ५ मते मिळाली, तर भारत (बापू) गोपाळराव सोले पाटील यांच्या भावजयी श्रीमती सुवर्णाताई सुनीलराव सोले पाटील यांच्या बाजूने ७ मते पडून त्यांचा ठराव ७ विरुद्ध ५ मतांनी मंजूर झाला.

हा ठराव विधान परिषदेचे सभापती नामदार प्रा. राम शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या गटाच्या विजयाचे प्रतीक मानला जात आहे.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय वारे, सभापती शरद (दादा) कार्ले, भारत (बापू) सोले पाटील, आरणगावचे माजी सरपंच अंकुश शिंदे, शाखाधिकारी सोनवणे साहेब तसेच मार्केट कमिटीचे संचालक डॉ. सिताराम ससाने यांच्या नेतृत्वाखाली हा ठराव मंजूर करण्यात आला.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात असून, आरणगावच्या राजकीय व सहकार क्षेत्रात या निकालाची मोठी चर्चा सुरू आहे.

Loading

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles