*जामखेड येथील सहारा हॉस्पिटलने दिला अनाथांना आधार…..*
आज दि.5 सप्टेंबर जामखेड प्रतिनिधी,
जामखेड येथील सहारा हॉस्पिटल आणि आय.सी.यु यांनी निवारा बालगृह मोहा फाटा (समता भूमी) ता.जामखेड जि.अहमदनगर येथे इयत्ता 3 री मध्ये शिक्षण घेत असणारी अनाथ मीनाक्षी हिच्या डोक्याला जखम झाली होती खूप वेळा हॉस्पिटला जाऊन उपचार केले. पण जखम बरी होत नव्हती तसेच बालगृहातील 85 मुलांना दररोज आईप्रमाणे स्वयंपाक करणारी निराधार पायल (ताई) हिच्या डाव्या हाताच्या बाजूला चरबीची मोठी गाठ होती त्या गाठीमुळे तिला भयंकर त्रास होत होता त्यांचे ऑपरेशन करणे खूप गरजेचे होते.
या अनाथ मीनाक्षी व निराधार पायल (ताई) यांची सर्व परिस्थिती समजून घेऊन सहारा हॉस्पिटलचे सर्व पदाधिकारी मा.डॉ.सचिन काकडे (रामेश्वर हॉस्पिटल संचालक) मा.डॉ.सुनील हजारे (स्री रोग तज्ञ) मा.डॉ.चंद्रकांत मोरे (सोनोग्राफी तज्ञ) मा.डॉ.मनोजकुमार शिंदे (भूल तज्ञ) मा.डॉ. आनंद लोंढे मा (M.D) मा.डॉ.दादासाहेब सावंत मा.जयसिंग उगले (प्रहार संघटना जि.उपाध्यक्ष) म्हणाले की आपल्या कमवलेल्या संपत्तीचा हिसा अनाथ,निराधार,कष्टकरी गोरगरिबांसाठी,समाजाचे देणे लागते म्हणून मदत केली पाहिजे असे ते म्हणाले.
यावेळी मा.डॉ.सचिन काकडे म्हणाले येथे आलेल्या रुग्णांचेअनाथ,निराधारांचे,गोरगरीबांचे, ॲड.डॉ.अरुण (आबा) जाधव हे कैवारी आहेत.त्यांची तळमळ आमच्या मनाला भासली त्यामुळे आम्हाला वाटले की आम्ही त्यामध्ये सहकार्य करावे म्हणून स्वतःला सहभागी करून व टीमला सहभागी करून अनाथ मीनाक्षी व निराधार पायल ताई यांचे ऑपरेशन करण्यासाठी 40,000/- रुपये खर्च येत होता .
पण आमच्या सहारा हॉस्पिटलच्या व आय.सी.यु टीमला वाटले की हॉस्पिटलच्या नावा प्रमाणे अनाथ निराधारांना सहारा दिला पाहिजे निवारा बालगृहातील अनाथ मीनाक्षी व पायल ताई यांचे ऑपरेशन मोफत करून दिला आधार .
यावेळी ॲड.डॉ.अरुण (आबा) जाधव (ग्रामीण विकास केंद्र संस्थापक अध्यक्ष) मा.संतोष चव्हाण (निवारा बालगृह व्यवस्थापक) यांचा सहारा हॉस्पिटलच्या वतीने सन्मान करण्यात आला.
यावेळी सहारा हॉस्पिटलचे सर्व स्टाप, दत्तात्रय लोखंडे,राजू दाणी, राहुल पवार,महेंद्रसिंग पावरा,कविता मते,गोपाळ पावरा,बालाजी आजबे, तुकाराम शिंदे, ऋषिकेश गायकवाड,सुरेखा चव्हाण आदी उपस्थित होते.