*कालिका पोदार लर्न स्कुल जामखेड येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा*

जामखेड प्रतिनिधी

कालिका पोदार लर्न स्कुल साकत फाटा जामखेड येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा झाला

विध्यार्थांमध्ये स्टेज डेरिंग वाढली पाहिजे विध्यार्थांमध्ये शिक्षकांविषयी आदर व आपुलकी वाढावी तसेच आपण ही शिक्षक झाले पाहिजे अशीही भावना यामुळे निर्माण होते व गुरु शिष्याचे नाते अजून मजबूत होण्यास या शिक्षक दिनामुळे मदत होते.

शिक्षक म्हणजे एक समुद्र,ज्ञानाचा आणि पावित्र्याचा एक आदरणीय कोपरा,प्रत्येक व्यक्तीच्या मनातला शिक्षक, अपुर्णाला पुर्ण करणारा
शिक्षक ,शब्दांनी ज्ञान वाढवणाराशिक्षक, जगण्यातुन जीवन घडवणारा,तत्वातुन मुल्य फुलवणारा शिक्षक आशा या देवतुल्य शिक्षकांप्रती कृतज्ञता दर्शवणारा दिवस म्हणजे शिक्षक दिन,हा दिवस विद्यार्थ्यांसाठी पर्वनीच. कालिका पोदारच्या विद्यार्थ्यांनी हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला मुख्याध्यापक प्रशांत जोशी सर,व शाळेचे संचालक श्री सागर अंदुरे सर,व निलेश तवटे सर यांनी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमाची सुरूवात केली.

तदनंतर विद्यार्थीशिक्षकांनी शिक्षकांचे पुष्पगुच्छ व भेटवस्तु देऊन स्वागत केले.आणि विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी विविध खेळांचे आयोजन केले.नाट्य,नृत्य,गायन सादर केले.या दिवशी इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक बनून संपुर्ण शालेय कामकाजाचा अनुभव घेतला.वआपली शिक्षकांप्रतिची कृतज्ञता व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *