उपक्रमशिल व विद्यार्थीप्रिय श्री . एकनाथ चव्हाण यांना जिल्हा परिषदेचा शिक्षक पुरस्कार जाहीर :- गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे…

जामखेड प्रतिनिधी :-

जामखेड तालूक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बसरवाडी ता. जामखेड येथील उपक्रमशिल , विद्यार्थीप्रिय ,समाजप्रिय ,कर्तव्यदक्ष शिक्षक श्री . एकनाथ पंढरीनाथ चव्हाण यांना अहमदनगर जिल्हा परिषदेचा सन २० २२- २०२३ चा जिल्हा शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे .त्या बददल जामखेड तालुक्यातील शिक्षकांच्या व प्रशासनाच्या वतीने गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी अभिनंदन केले आहे .

 

याआधीही बसरवाडी शाळेला स्वच्छ व सुंदर शाळा पुरस्कार मिळालेला आहे. तसेच ही शाळा जिह्यातील पहिली आय एस ओ मानांकन प्राप्त झालेली शाळा आहे . एका चांगल्या शिक्षकाचा सन्मान झाल्याने त्यांनी केलेल्या कामाची प्रेरणा इतर शिक्षकांना नक्की मिळेल .
त्यांना जिल्हा शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे ,शिक्षण विस्तार अधिकारी सुनिल जाधव

त्र्यंबके , शिक्षक बँकेचे संचालक संतोष राऊत , केंद्रप्रमुख राम निकम , नारायण राऊत ‘केशव गायकवाड , बाळासाहेब कुमटकर , सुरेश मोहिते , संतोष वांढेकर ,रामदास गंभीरे , घोडके , पारखे , सुनिल महामुद्रे , बाळासाहेब गांगर्डे ,नरवणे , श्रीम. ससाणे श्रीम. कात्रजकर , श्री. निमसे पाटील , सर्व विषय तज्ञ व साधन व्यक्ति यांनी अभिनंदन केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *