खर्डा: आशाताई शिंदेंच्या प्रमुख उपस्थितीत सरपंच संजीवनी पाटील यांनी स्वीकारला पदभार, जनतेला समजलं आहे आपला तो आपलाच असतो : आशाताई शिंदे
कर्जत-जामखेड मतदारसंघातील दोन्ही बाजार समित्या व खर्डा ग्रामपंचायत भाजपाच्या ताब्यात आल्याने आ. राम शिंदे यांना जे यश मिळाले आहे ते फक्त कार्यकर्त्यांच्या एकनिष्ठपणामुळे व जनतेने पुन्हा विश्वास दाखवल्या मुळेच. यावरून आता जनतेला समजलं आहे की, आपला तो आपलाच असतो असतो. तसेच तुम्ही आजपर्यंत तुमच्या कार्यकर्त्यांना सांभाळून शकले नाहीत त्यामुळे तुम्हाला इतक्या मोठ्या प्रमाणावर पराजय स्विकारावा लागत आहे. आ. पवारांवर अशी जोरदार टीका करत सर्व जनतेचे व कार्यकर्त्यांचे आभार मानून पंचायत समितीच्या माजी सभापती आशाताई राम शिंदे यांनी नवनिर्वाचित सरपंच सौ संजीवनी पाटील शुभेच्छा दिल्या.
जामखेड तालुक्यातील सर्वात मोठ्या खर्डा ग्रामपंचायतवर भाजपचा झेंडा फडकला असून आज दि. १२ जून रोजी पंचायत समितीच्या माजी सभापती आशाताई राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत नवनिर्वाचित सरपंच संजीवनी वैजीनाथ पाटील यांनी पदभार स्वीकारला. यावेळी आशाताई राम शिंदेंसह, भाजपाचे कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र प्रमुख रवींद्र सुरवसे, बाजार समिती सभापती शरद कार्ले, सोमानाथ राळेभात, माजी सरपंच संजय गोपाळघरे, सर्व भाजपा महिला ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी प्रशांत सातपुते, ग्रा. प. सदस्य सोपान गोपाळघरे, राजू मोरे, सुग्रीव भोसले, तुकाराम होडशीळ, महेश दिंडोरे, गणेश शिंदे, नानासाहेब गोपाळघरे, बाळासाहेब गोपाळघरे, बाजीराव गोपाळघरे, टील्लू पंजाबी, गोटू कांबळेंसह भाजपा कार्यकर्ते व खर्डा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना रवींद्र सुरवसे म्हणाले की, मागील आडीच वर्षांच्या काळात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी मला वैयक्तिक खूप त्रास दिला आहे. आता विरोधकांना त्यांचा पराभव दिसत आहे. कर्जत व जामखेड बाजर सामीतीमध्ये आमचेच सभापती व उपसभापती झाले आहेत. तसेच खर्डा ग्रामपंचायतवर पण आमचाच झेंडा लागला आहे. त्यामुळे भाजपा कार्यकर्ते व आ. राम शिंदे यांच्याच प्रयत्नाने बाजार समितीमध्ये वैजनाथ पाटील आलेच पण त्यांच्या पत्नीही सरपंच झाल्या आहेत.
सरपंचपदाच्या निवडीवेळी आमच्याकडे ८ सदस्य होते व विरोधकांकडे ९ सदस्य होते. त्यांच्याकडील आमच्याकडे तीन सदस्य आले व आम्ही बाजूच पलटून टाकली आज भारतीय जनता पक्षाचे सरपंच झाले, यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी खूप कष्ट घेतले आहे. विरोधकांना आता समजलं आहे. आ. राम शिंदे पुन्हा आलेत. येत्या २०२४ ला बाहेरून आलेलं पार्सल आता बारामतीला पाठवायचा आहे. आ.राम शिंदे यांना निवडून आणायचे आहे. या दोघांनाही पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो
सरपंच संजीवनी पाटील यांचे पती व बाजार समितीचे संचालक वैजनाथ पाटील यांनीही आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले की, माझी खरी ताकत ही आ. प्रा.राम शिंदे, कर्जत -जामखेड विधानक्षेत्र प्रमुख रवी दादा सुरवसे व माजी सरपंच संजय गोपाळघरे हे आहेत. यांच्यामुळे मला निवडणूक लढवण्याची ताकद भेटली. नगर जिल्ह्यातील एकमेव खर्डा ग्रामपंचायत ही सर्वोत्तम ग्रामपंचायत करण्याची आज मी जनतेला ग्वाही देतो. आम्ही दोघे मिळून विकास कामे करू. यापुढे गावाचा १००% विकास करण्यात येईल अशी ग्वाही देतो.
यावेळी जामखेड चे मार्केट कमिटीचे सभापती शरद कार्ले, मा.सरपंच संजय गोपाळघरे, ग्रामपंचायत सदस्य सोपान गोपाळघरे, बाळासाहेब शिंदे यांनीही आपापले मत व्यक्त करून सरपंचाना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या