*गायत्री राळेभात यांची PSI पदी निवड झाल्याबद्दल शितल कलेक्शनच्या वतीने सत्कार*

*नक्कीच PSI गायत्री राळेभात सामान्य जनतेला न्याय देतील -सागर अंदुरे(शीतल कलेक्शन)*

जामखेड प्रतिनिधी,

जामखेड येथे रहिवाशी असणारे नामदेव राळेभात यांचे चिरंजीव भुषण व सुनबाई गायत्री हे दोघेही उच्चशिक्षित असुन भुषण नामदेव राळेभात यांची आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी बाहेरील देशात निवड झालेली आहे तर गायत्री यांची मलेशिया येथे एक
महिन्याचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी देखील
निवड झाली होती. आता गायत्री भूषण राळेभात यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षा मध्ये PSI पदी निवड झाली
आहे.जामखेड मध्ये त्यांचं आगमन होताच शितल कलेक्शन चे संचालक सागर अंदुरे व सर्व कर्मचारी यांनी psi गायत्री राळेभात व भूषण राळेभात यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना सागर अंदुरे म्हणाले,गायत्री भूषण राळेभात यांनी हे यश संपादनासाठी आपली मेहनत,चिकाटी,अभ्यासातील सातत्य आणि लग्न झाल्यावर सुद्धा अभ्यासातील आवड आणि ध्येय गाठण्याची जिद्द त्यांना या पदापर्यंत घेऊन आली आहे.आणि त्या या पदाला नक्कीच न्याय देतील आणि जामखेडच नाव उंचावतील यात शंका नाही त्यांना आमच्या कुटूंबातर्फे व शितल कलेक्शनच्या वतीने अभिनंदन.

गायत्री भूषण राळेभात यांची पीएसआय पदी निवड झाल्याबद्दल विविध क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा
वर्षाव होत आहे.

गायत्री राळेभात या महात्मा फुले कृषी विद्यापीठ,
राहुरी येथे कृषी विस्तार विषयामध्ये आचार्य
पदवीचे पीएचडी शिक्षण घेत आहेत. गायत्री
यांची मलेशिया येथे एक महिन्याचे आंतरराष्ट्रीय
प्रशिक्षणासाठी देखील निवड झाली होती.

श्रीयूत भुषण नामदेव राळेभात यांची
आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी व्हिएतनाम येथे निवड महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प व भारतीय
कृषी अनुसंधान परिषदेचे हवामान अद्यावत
शेती व जलव्यवस्थापणाचे आधुनिक कृषी
विज्ञान आणि तंत्रज्ञान या प्रकल्पांतर्गत स्मार्ट
शेती वर आधारित आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण
घेण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
येथील आचार्य पदवी (पीएचडी) चे जामखेड चे
विद्यार्थी मा. श्रीयुत भुषण नामदेव राळेभात
यांची कॅन थो युनिव्हर्सिटी व्हिएतनाम येथे एक
महिन्याच्या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी निवड
झाली होती.

यावेळी सत्काराला उत्तर देताना गायत्री राळेभात म्हणाल्या, सागर शेठ अंदुरे व त्यांच्या सर्व स्टाफचे व विशेष म्हणजे सर्व माता भगिनींचे आभार मानते व माझ्या यशामध्ये माझे पती, दीर सासू सासरे, आई वडील व सर्व जामखेडकरांचा आशीर्वाद असल्यामुळे व माझ्या मेहनतीचे फळ मला मिळाले आहे आणि गोरगरिबांची सेवा निःस्वार्थ पणे करिन असे मत व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *