स्व. शिवचंद (भाऊ) सुराणा यांच्या जन्म जयंती निमित्त वृद्धाश्रमातील वृद्धांना मिष्टान्न भोजन

जामखेड प्रतिनिधी,
जामखेड शहरातील प्रसिद्ध उद्योगपती आणि दानशुर स्वर्गवासी शिवचंद (भाऊ) यांचे नुकतेच दुःखद निधन झाले होते परंतु त्यांचा आज ८५ वा वाढदिवस नळी वडगाव येथील श्री संत ज्ञानेश्वर माऊली वृद्धाश्रम येथे करण्यात आला यावेळी सर्व वृद्धांना मिष्टांन्न भोजन देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला

यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी म्हणाले स्वर्गवासी शिवचंद (भाऊ) सुराणा यांचे कार्य खूप उल्लेखनीय होते समाजामध्ये दानशुर व्यक्ति होती दान धर्म करत होते चाळीस वर्षांपूर्वी आम्ही जामखेड शहरात गणपती बसवायचा असेल तर पहिली वर्गणी शिवचंद (भाऊ) कडे जात होतो आणि ते आम्हाला समाधानी करून पाठवत होते.

यावेळी बोलताना भारतीय जैन संघटनेचे जिल्हा सचिव प्रफुल्ल सोळंकी म्हणाले शिवचंद दादाजी हे खूप दानशुर होते प्रेमळ होते धार्मिक होते त्यांच्या मागे आमचा मित्र चेतन सुराणा हा सुद्धा खूप धार्मिक कामात पुढे असतो कोरोना काळामध्ये चेतन याने खूप लोकांना मदत केली
या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, प्रफुल्ल सोळंकी, रवींद्र पांडुरंग कुलकर्णी गणेश लुंकड, माऊली लोखंडे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *