7 मे रोजी मोदींच्या सभेने दुमदुमणार अहिल्यानगरी

नगर । प्रतिनिधी

 

नगरकर ज्या सभेचे आतूरतेने वाट पाहत आहेत. ती पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा येत्या ७ मे रोजी नगरमधील संत निरंकारी भवन जवळचे मैदान, सावेडी येथे सांयकाळी ४ वाजता पार पडणार आहे. अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी दिली आहे. यामुळे नगरकरामध्ये मोठे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नगरमध्ये ६ तारखेला होणार होती. मात्र पंतप्रधानांचा महाराष्ट्र दौरा एक दिवस पुढे ढकल्याने ही सभा आता ७ मे रोजी नियोजीत वेळेत होणार आहे. सध्या प्रचार अखेरच्या दिवसात असल्याने सर्वांना या सभेचे वेध लागले होते.

 

पंतप्रधान मोदी हे चौथ्यांदा नगरच्या भूमीत येत आहेत. निवडणुकीत आधीच खा. डॉ. सुजय विखे यांनी प्रचारात आघाडी घेतली असल्याने सध्या जिल्ह्यात त्यांचे वातावरण असून पंतप्रधानांच्या सभेने त्यात अधीक भर पडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नगरच्या निरंकारी मैदान येथे पंतप्रधान मोदींच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. नगरकरांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विशेष प्रेम असून त्यांना ऐकण्यासाठी लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी लोटणार असून त्याचे नियोजन करण्यात सर्व महायुतीचे घटक पक्ष काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *