आमदार राम शिंदे यांनी कार्यकर्त्यांत भरली नवी ऊर्जा,निवडणूक प्रचार नियोजन सभेत ठरला प्रचाराचा आराखडा !!

जामखेड प्रतिनिधी,

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या निवडणूक प्रचार नियोजना संदर्भात आमदार राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जामखेड येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत निवडणुकीची रणनीती ठरविण्यात आली. यावेळी राम शिंदे यांनी कार्यकर्यांत नवी ऊर्जा दिली आणि सुजय विखे पाटील यांना मोठया मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार केला. यामुळे डॉ. सुजय विखे पाटील यांच्या विजयाच्या वाटा अधिक सोयीस्कर झाल्या आहेत.

 

मागील काही दिवसांपासून सुजय विखे आणि राम शिंदे यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चा होत होत्या. मात्र मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीतुन सर्व वाद संपुष्टात आले. याची प्रचिती या कार्यकर्ता मेळाव्यात दिसून आली. भाजप कार्यकर्त्यांनी सुजय विखे पाटील आणि आमदार राम शिंदे यांच्यापुढे आपल्या समस्या आणि अडचणी मांडल्या. त्यांना उत्तर देताना डॉ. सुजय विखे पाटील यांनी कोणतेही समज गैरसमज उरणार नाही असे आश्वासन दिले.

तर आमदार राम शिंदे यांनी कार्यकऱ्यांशी संवाद साधत सुजय विखे आणि राम शिंदे एकत्र त्यांच्यात कोणतेही मदभेद नसून एकदिलाने आणि सर्व ताकतीने डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासाठी काम करायचे आहे असे सांगत जामखेड मधून सर्वाधिक मते ही सुजय विखे यांना मिळतील असे आश्वासन दिले. तसेच प्रचाराचे नियोजन कसे असणार याबाबत मार्गदर्शन केले. पुन्हा एकदा सुजय दादांच्या रूपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करायचे आहे असे त्यांनी सांगितले.

पुढे बोलताना आ. प्रा. राम शिंदे म्हणाले की पक्षाने आदेश दिल्या नंतर आमच्या मध्ये मतमतांतरं होऊ शकत नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली खा. सुजय विखेंना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी तालुक्यातील कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. अहील्यानगर दक्षिण मधून खा. सुजय विखेंना तिकीट फायनल झाल्यावर आम्ही सर्व भाजप पदाधिकारी यांच्या उपस्थितीत खा. सुजय विखेंचा सत्कार केला आहे.

यानंतर खा. सुजय विखे यांनी बोलताना सांगितले की अहील्यानगर जिल्ह्यातील रस्ते गतीमान झाले आहेत. सध्या टंचाई आसल्याने टॅंकर बाबत प्रशासन स्तरावर निर्णय घेतला जाईल. जामखेड ते सौताडा या रस्त्याच्या बाबत दोन ठेकेदार बदलले आहेत. तरी देखील काम संथ गतीने सुरू आहे त्यामुळे ठेकेदारने हलगर्जीपणा केला आसल्यास जुना कॉन्ट्रॅक्टर रद्द करुन नवीन निविदा काढुन नवा ठेकेदार देण्यात येईल आसे देखील खा. सुजय विखेंनी सांगितले.

यावेळी खा. सुजय दादा विखे, आ. प्रा. राम शिंदे जिल्हा अध्यक्ष दिलीप भालसिंग तालुका अध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र सुरवसे, माजी सभापती डॉ भगवान मुरुमकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, तालुका अध्यक्ष अजय (दादा) काशिद, सोमनाथ पाचरणे, भारतीय जनता पार्टी चे उपाध्यक्ष बापुराव ढवळे, सरपंच वैजनाथ पाटील, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस लहु शिंदे, पांडुरंग उबाळे, बाळासाहेब गोपाळघरे, पवन राळेभात, बिबीशन धनवडे, गणेश जगताप, राजेंद्र ओमासे, राहुल चोरगे, दत्ता गीरी, तुषार बोथरा सह अनेक भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *