खा.डॉ विखे यांना धमकी देणार्या व्यक्ति विरोधात कायदेशीर कारवाई करा!

महायुतीच्या शिष्टमंडळाची जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडे मागणी

जामखेड प्रतिनिधी,

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खा डॉ सुजय विखे पाटील यांना धमकी देणार्या संबंधित व्यक्ति आणि त्यांना पाठबळ देणार्या विरोधात ताताडीने कारवाई करावी तसेच खा.डॉ विखेंच्या संरक्षणात वाढ करण्याची मागणी महायुतीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.

खा.डॉ सुजय विखे पाटील यांना गोळ्या घालण्याची ध्वनिफीत समाज माध्यमातून प्रसारीत झाल्याने या घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून महायुतीच्या वतीने जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सिध्दराम सालीमठ यांना निवेदन देण्यात आले.माजी मंत्री आणि जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डीले आ.संग्राम जगताप भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग उतर नगरचे विठ्ठलराव लंघे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, वसंत लोढा, सचिन पारखी विश्वनाथ कोरडे विनायक देशमुख,बाबुशेठ टायरवाले विक्रमसिंह पाचपुते शिवसेनेचे अनिल शिंदे, यांच्यासह सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

शिष्टमंडळाने या घटनेचे गांभीर्य अधिकार्यांच्या निदर्शनास आणून दिले.लोकसभा निवडणुकीची प्रक्रीया सुरू झाली असताना उमेदवारावा धमकावण्याची बाब अतिशय गंभीर आणि अचारसंहीता नियमांचे उल्लंघन करणारे असल्याची बाब जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या.धमकी देणारा व्यक्ति कोणाचा समर्थक आहे कोणाचे पाठबळ त्यांना आहे या बाबी उघड होणे अत्यंत गरजेचे असून कारवाई झाल्यानंतर यासर्व गोष्टी समोर येणार असल्याने प्रसारीत झालेल्या ध्वनिफीतीच्या आधारे संबंधित व्यक्तिचे काॅल डिटेल्स टाॅवर लोकेशन तपासून कायदेशार कारवाई करावी आशी मागणी शिष्टमंडळाने निवेदनातून केली आहे.

महायुतीचे उमेदवार खा डॉ सुजय विखे पाटील यांना जनतेकडून अतिशय चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असलेला प्रतिसाद पाहाता आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यां मध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता निर्माण होत आहे.याच कारणाने मतदार आणि उमेदवारांना जाणीवपुर्वक धमकावण्याचे प्रकार महाविकास आघाडी कडून सुरू झाले असल्याचे शिष्टमंडळाने सांगितले.

निवडणूक प्रकरीयेत आशा पध्दतीची दडपशाही करून मतदार तसेच उमेदवार यांना धमकावून एकप्रकारे सामाजिक दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याने संबंधित व्यक्तिवर कारवाई होणे अत्यंत गरजेचे असल्याची भूमिका शिष्टमंडळाने मांडली.


दरम्यान या प्रकारानंतर निवृती घाटगे यांनी व्हीडीओ प्रसारीत करून मांडलेल्या भूमिके विरोधात शिवसेनेचे अनिल शिंदे यांनी पोलीस अधीक्षकांना स्वतंत्र निवेदन दिले असून घाटगे यांचा शिवसेनेशी कोणताही संबंध नाही.याबबात त्यांनी विरोधी उमेदवारा समवेत असलेले घाटगे यांचे फोटो तसेच खा डॉ सुजय विखे यांच्या विरोधात समाज माध्यमात केलेल्या टिकात्मक प्रतिक्रीयेचे पुरावेही जिल्हा पोलीस अधीक्षकांना सुपूर्त केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *