खर्डा रस्त्यावर किराणा मालाच्या बर्नीग टेंम्पोचा थरार
जामखेड प्रतिनिधी
जामखेड पासून पाच किलोमीटर अंतरावर खर्डा रोड वरील रानवारा हाॅटेल जवळ शहरातील किराणा मालाचे व्यापारी तोडकरी बंधु यांच्या किराणा दुकानातुन माल घेऊन वालवड येथील व्यापारी बाळासाहेब विभुते यांनी खरेदी केलेला माल ड्रायव्हर सुनील विभुते जामखेड हुन वालवड ला जात असताना अजिंक्यतारा हॉटेल समोर अचानक टेंम्पो एम एच 25 बी 6685 या आयसर टेंम्पोला आचानक आग लागली हा टेंम्पो जामखेडहुन वालवड या ठिकाणी किराणामाल घेऊन चालला होता आचनक टेंम्पोने पेट घेतल्याने काही समजण्याच्या आतच आगीचे लोळ बाहेर पडु लागले दोन्ही बाजुने वाहातुक थांबली गेली आगीची तीव्रता लक्षात घेत घटनेची माहिती समजतात
सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी अग्निशामक चे चालक यांना ताबडतोब फोन करून नगरपरिषदेचे आग्नीशामक ताबडतोब दाखल झाले तसेच वाहातुक नियंत्रणात आणण्यासाठी जामखेड पोलीस स्टेशनच्या साह्यक पोलीस निरीक्षक संगीता गिरी, पोलीस उपनिरीक्षक आनिल भारती, साह्यक फौजदार लहु यादव, पोलीस काँन्टेबल दिनेश गणगे, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, आग्नीशामक कर्मचारी अय्यास शेख, विजय पवार, राजु माने तर स्थानिक कार्यकर्ते प्रविण बहीर, भाऊसाहेब तनपुरे, दादासाहेब जगदाळे, दादा बहीर , महादेव बहिर, अमर हुलगुंडे यांनी आग विझवण्यासाठी मदत केली
किरणामालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे टेंम्पोचा तर फक्त सांगाडा दिसत आसल्याचे चित्र पहावयास मिळाले प्रशासनाच्या सतर्कतेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही