28.5 C
New York
Friday, August 7, 2026

वीज पोल उभारताना नगरपरिषदेची भूमिगत गटार लाईन व चेंबर फोडल्याप्रकरणी ठेकेदारासह व्यवस्थापकाविरोधात जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा…

वीज पोल उभारताना नगरपरिषदेची भूमिगत गटार लाईन व चेंबर फोडल्याप्रकरणी ठेकेदारासह व्यवस्थापकाविरोधात जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा…

 जामखेड  प्रतिनिधी –

जामखेड नगरपरिषदेच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी वीज पोल उभारणीचे काम करणाऱ्या ठेकेदार व व्यवस्थापकाविरोधात जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगरपरिषद जामखेड येथील बांधकाम विभागात लिपिक म्हणून कार्यरत असलेले वलीमहमंद रशिद सय्यद (वय ४१, रा. नुराणी कॉलनी, जामखेड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.फिर्यादीनुसार, दि. १५ जुलै २०२६ रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे यांना सागर टकले यांनी दूरध्वनीवरून माहिती दिली की, समता तरुण मंडळ कमानीजवळ, आरोळवस्ती येथे वीज पोल उभारणीचे काम सुरू असताना नगरपरिषदेची भूमिगत गटार पाइपलाइन व गटारीचे चेंबर फोडले जात आहे.

त्यानंतर मुख्याधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार वलीमहमंद सय्यद यांनी घटनास्थळी भेट दिली.तेथे ए. एन. साखरे इलेक्ट्रिकल्स (रा. किर्लोस्कर सोसायटी, महादेव नगर, मांजरी रोड, ता. हवेली, जि. पुणे) या ठेकेदारामार्फत व त्यांचे व्यवस्थापक दत्ताजय मदने यांच्या देखरेखीखाली वीज पोल उभारणीचे काम सुरू असताना नगरपरिषदेची सार्वजनिक मालमत्तेतील भूमिगत गटार पाइपलाइन व गटारीचे चेंबर फोडून नुकसान झाल्याचे निदर्शनास आले.या घटनेत नगरपरिषदेच्या सार्वजनिक मालमत्तेचे अंदाजे ४० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा फिर्यादीने केला आहे.

याप्रकरणी संबंधित ठेकेदार आणि व्यवस्थापकाविरोधात कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली असून जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Loading

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

You cannot copy content of this page