*वारंवार केंद्रिय मंत्र्यांच्या भेटी घेऊन बँकिंग सेवा सुधारण्यासाठी केलेल्या प्रयत्नांतूनच मतदारसंघातील बँकिंग सेवा मोठ्या प्रमाणात सुधारली; बँकेसाठी लागणाऱ्या सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्या – आमदार रोहित पवार*
कर्जत / जामखेड | आपल्या कर्जत-जामखेड मतदारसंघातील बँकिंग सेवा वाढवण्यासंदर्भात कोरोना काळापासूनच आमदार रोहित पवार यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन व अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्याकडे दिल्लीत भेट देऊन पाठपुरावा सुरू केला होता. दरम्यान यासाठी लागणाऱ्या सर्व प्रक्रिया देखील आमदार रोहित पवार यांनी पूर्ण करून घेत राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखा आपल्या मतदारसंघात अधिक प्रमाणात सुरू करून सर्वसमावेशक बँकिंग सेवा वाढवण्यासंदर्भात वेळोवेळी भेट घेऊन केंद्रीय मंत्र्यांकडे याबाबत मागणी केली होती आणि मंत्र्यांनीही यावर सकारात्मक प्रतिसाद देत तात्काळ पुढील कार्यवाहीचे आदेशही दिले होते. त्या प्रक्रियेत प्रगती देखील झाल्याचे आपल्याला पाहायला मिळाले. बँकेच्या सेवा सुधारणेमध्ये मंत्र्यांच्या आदेशानंतर बदलही झाले आणि त्याचा फायदा चांगल्या सेवा मिळण्यासाठी नागरिकांना होत आहे.
दरम्यान, स्टेट लेव्हल बँकिंग कमिटी (SLBC) अंतर्गत या सुविधांसाठी मान्यता मिळावी यासाठी देखील केंद्रीय मंत्र्यांकडे आमदार रोहित पवार यांनी भेट घेऊन पाठपुरावा केला होता. स्टेट लेव्हल बँकिंग कमिटीच्या बैठकीसाठी DPDC ची मान्यता घेऊन प्रस्ताव पुढे देखील पाठवण्यात आला होता. तसेच लीड बँकेने याबाबत लागणारा सर्व्हे देखील यापूर्वीच पूर्ण केला आहे. त्यामुळे सर्व प्रक्रिया ही आमदार रोहित पवार यांनी वैयक्तिक लक्ष घालून पूर्ण करून घेतली आहे. एखादी केंद्रीय पातळीवरील किंवा कोणतीही मंजुरी मिळवायची असेल तर त्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे सादर करणे पाठपुरावा करणे आणि जी नियमानुसार प्रक्रिया आहे ती पूर्ण करणे हे गरजेचे असते. त्यामुळे उगाच कोणीतरी लोकांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांना फोन करून मंजुरी मिळवली असे सांगत असेल तर त्यात कितपत तथ्य आहे हे लोकांनीच समजून घ्यावे, असे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे.
शिवाय, फक्त बँकिंग नाही तर गेल्या अनेक वर्षापासून ज्या गोष्टी विकासाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या गोष्टी घडत नव्हत्या आता त्या घडायला लागल्याने विरोधक उगाच निवडणुकीच्या तोंडावर जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचे काम करत आहेत. परंतु जनता सुज्ञ आहे आणि ते हे सर्व ओळखून आहेत. सध्या मतदारसंघातील बँकिंग सुविधा काही प्रमाणात सुधारली असून आणखी चांगल्या सुविधा नागरिकांना मिळाव्या यासाठी देखील आमदार रोहित पवार यांचा पाठपुरावा सुरू आहे आणि याबाबतच्या सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता त्यांच्या मार्फत करण्यात आली आहे.