खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात कोट्यवधी रुपयांची विकास कामे मार्गी -सौ.धनश्री सुजय विखे पाटील

जामखेड प्रतिनिधी,

खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या पाच वर्षाच्या काळात नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात केंद्र सरकारच्या अनेक योजनांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांच्या निधीचे कामे मार्गी लागले असल्याचे प्रतिपादन सौ. धनश्री सुजय विखे पाटील यांनी खर्डा येथे बोलताना सांगितले.

त्या खर्डा येथे ग्रामीण स्वयंरोजगार निर्मिती अंतर्गत साहित्य व कर्जवाटप कार्यक्रमात बोलत होत्या.
पुढे बोलताना सौ.विखे पाटील म्हणाल्या की, केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक विकास कामे मार्ग लागली आहेत तसेच महिलांना स्वयंरोजगारच्या माध्यमातून सक्षम करण्यासाठी व व्यवसायाला पूरक असे कर्ज वाटप करून महिलांना सक्षम होण्यासाठी अनेक योजना गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम झाले आहे.

डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून महिला बचत गटांना सक्षम व बळकट करण्यासाठी अनेक योजना राबविल्या आहेत,तसेच रस्त्यांची कामे सुरू असून पुढील काळात या भागातील दळणवळणाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असल्याचे सौ. धनश्री विखे म्हणाल्या.
यावेळी महिला बचत गटांना स्वयंरोजगार व्यवसाय उपकरणे देण्यात आली तसेच कृषी विभागामार्फत स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे अपघात विम्याचे महिलांना वाटप व शेतकऱ्यांना अनुदानित ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी सरपंच संजीवनी पाटील माजी सभापती मनीषा सुरवसे भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रवी सुरवसे, मार्केट कमिटीचे संचालक वैजिनाथ पाटील, भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष बाजीराव गोपाळघरे, माजी सरपंच संजय गोपाळघरे, भाजपाचे नेते नानासाहेब गोपाळघरे, ग्रामपंचायत सदस्य महेश दिंडोरे, राजू मोरे, बाळासाहेब गीते, करण ढवळे, बाळासाहेब गोपाळघरे, महारुद्र महारनवर, व महिला बचत गटाच्या महिला व खर्डा ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *