शिक्षकांना विश्वासात घेऊन काम करणारे , शिक्षकांच्या चांगल्या कामाचे कौतूक करणारे श्री. बाळासाहेब धनवे हे जामखेड तालुक्यातील पहीलेच गट शिक्षणाधिकारी :- श्रीम. कामिनी राजगुरू…
जामखेड :- जामखेड तालुक्यातील शिक्षकांना व शिक्षक संघटना यांना विश्वासात घेऊन काम करणारे तसेच चांगले काम करणाऱ्या शिक्षकाचे कौतुक करणारे बाळासाहेब धनवे हे जामखेड तालुक्यातील पहीलेच गटशिक्षणाधिकारी आहेत असे मनोगत जिल्हा शिक्षक संघटनेच्या नेत्या श्रीम. कामिनी राजगुरू यांनी व्यक्त केले .
जामखेड तालुक्यातील ४२ प्राथमिक शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर केल्याबद्दल सर्व शिक्षक संघटनेच्या वतीने जामखेड पंचायत समितीच्या सभाग्रहात धनवे यांचा सत्कार आयोजीत करण्यात आला होता त्यावेळी त्या बोलत होत्या
त्या पुढे म्हणाल्या की ‘, बाळासाहेब धनवे हे तालुक्यात हजर झाल्यावर शिक्षकांचे अनेक प्रश्न सोडविले शिक्षकांचे अनेक वर्षापासून रखडलेली वैद्यकिय बीले , रजा , अदि. प्रश्न त्यांनी मार्गी लावले . काम करणाऱ्या शिक्षकाचे ते कौतूक करतात व समाज माध्यामांवर प्रसिद्धी देतात त्यामुळे शिक्षकांची तालूक्यत चांगली प्रतिमा तयार झाली आहे . शिक्षकांची पोस्ट व्हॅट- अॅप ग्रुपवर पोस्ट करणारे बाळासाहेब धनवे हे पहिलेच अधिकारी आहेत . त्यांच्या कामामुळेच तालुक्याची शैक्षणिक गुणवत्तेत चांगली सुधारणा झाली आहे .
जामखेड तालुका शिक्षक संघटनेच्या तालूका अध्यक्ष श्रीम. अर्चना भोसले म्हणाल्या बाळासाहेब धनवे तालुक्यात चांगले शैक्षणिक वातावरण निर्माण झाले आहे. त्यांनी शिक्षकांचे अनेक प्रश्न सोडविले आहेत राहीलेले प्रश्नही सोडवावेत अशी मागणी त्यांनी केली . यावेळी विविध शिक्षक संघटनेच्या प्रतिधिंनी आपली मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला जामखेड तालुक्याचे माजी गटशिक्षणाधिकारी तथा बीड जिल्ह्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री. नागनाथ शिंदे हेही यावेळी उपस्थित होते .