कोल्हेवाडी येथील संतप्त महिलांनी महावितरण कार्यालयाला ठोकले टाळे
जामखेड प्रतिनिधी,
तालुक्यातील साकत ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या कोल्हेवाडीच्या संतप्त महिलांनी महावितरणच्या कार्यालयाला घेराव घालत कार्यालयाला टाळे ठोकले आहे. जोपर्यंत लाईट सुरू होत नाही तोपर्यंत टाळे उघडणार नाही यावर महिला ठाम होत्या महावितरणच्या कार्यालयात एकही अधिकारी व कर्मचारी नव्हते दिपावली सुट्टी असल्याचे त्यांनी सांगितले. महिला खुपच सतंप्त होत्या.
चार महिन्यांपासून पाणीपुरवठा बंद आहे. लाईटच्या तारा तुटल्याने चार महिन्यांपासून पाणीपुरवठा बंद आहे. यामुळे सतंप्त महिलांनी महावितरणच्या कार्यालयाला घेराव घातला. व कार्यालयाला टाळे ठोकले जोपर्यंत लाईट सुरू होत नाही तोपर्यंत टाळे उघडणार नाही असे महिलांनी सांगितले आम्हाला सणा सुदीच्या काळात महिलांना दिवसभर लाईट साठी घरदार सोडून जामखेड मध्ये बसावे लागले.
महिलांचा रूद्र अवतार पाहून महावितरण खडबडून जागे झाले व ठेकेदारांला ताबडतोब कोल्हेवाडी येथील लाईट जोडण्यासाठी सांगितले.
यावेळी महिला समवेत सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे, बिभीषण धनवडे, सरपंच हनुमंत पाटील, उपसरपंच राजाभाऊ वराट, सागर कोल्हे, संतोष कोल्हे, अशोक कोल्हे, विनोद कोल्हे, गोजर नेमाने कृषी सखी पंचायत समिती, मनिषा कोल्हे, अलका कोल्हे, द्वारकाबाई कोल्हे,
अनिता कोल्हे, उषा पवार, मैना कोल्हे, जयश्री सरोदे, मंगल कोल्हे, अंजली कोल्हे, गौरी कोल्हे, राणी कोल्हे, सिंधुताई कोल्हे, रतन शेख, सोनाली कोल्हे, शांताबाई कोल्हे, बायडाबाई कोल्हे, शालन कोल्हे, कांताबाई कोल्हे यांच्या सह अनेक महिला उपस्थित होत्या.
यावेळी लेहनेवाडी येथील मगर वस्ती वरील सिंगल फेज डिपी बंद आहे. बीले भरूनही सणासुदीला अंधारात राहावे लागत आहे. यामुळे अनेक सतंप्त तरूण आले होते. पांडुरंग मगर, रामहरी बाबर, सोमनाथ कांबळे यांच्या सह अनेक तरुण उपस्थित होते.