*माझी दिवाळी अनाथ निराधारांसोबत…..*
पो. निरीक्षक महेश पाटील

आज दिनांक 10 नोव्हेंबर 2023 रोजी ग्रामीण विकास केंद्र संचलित निवारा बालगृह मोहा फाटा (समता भूमी) ता- जामखेड जि- अहमदनगर येथील अनाथ, निराधार मुलांना नवीन कपडे व गोड फराळ देऊन एक अनोखी दिवाळी साजरी करण्यात आली.
निवारा बालगृह याठिकाणी गेली सात वर्ष पासून 83 अनाथ, निराधार मुला- मुलींचे लोकवर्गणीतून व लोकसहभागातून शिक्षण आणि संगोपन केले जात आहे. ज्यावेळेस बालगृहाला अन्नधान्य किराणा शैक्षणिक साहित्य कपडे यांची अडचण भासेल त्या त्या वेळेस आम्ही हक्काने जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील साहेब यांना मदतीचा हात मागत असतोत, आणि तेही आम्हाला मदत करत असतात. त्याचप्रमाणे याही वर्षी मुलांना दिवाळीनिमित्त नवीन कपड्यासाठी त्यांना विनंती केली आणि त्यांनी सर्व मुलांना नवीन कपड्यासाठी त्यांचा महिन्याचा एक पगार 50 हजार रुपयांचे कपडे घेऊन दिले. व तसेच जामखेड शहरातील मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक वटाणे सर यांनीही सर्व मुलांना 5 हजार रुपयाचे गोड फराळ घेऊन दिले त्याचप्रमाणे पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मा. बाळासाहेब धनवे साहेब यांनीही मुलांना गोड फराळासाठी 5 हजार रुपयांची मदत दिली, अशा या दानशूर व्यक्तींनी एक आपली अनोखी दिवाळी या बालगृहातील मुलांसमवेत साजरी केली
हा कार्यक्रम मोहा गावचे सरपंच मा.भीमराव कापसे यांच्या अध्यक्षतेखाली व उपविभागीय अधिकारी मा. सायली सोळंके,पोलीस निरीक्षक मा. महेश पाटील, गटशिक्षणाधिकारी मा.बाळासाहेब धनवे,मा. जयसिंग उगले मा. डॉ. संदीप भवर मा.डॉ आशोक बांगर, केंद्रप्रमुख किसन वराट सर, संस्थेचे संस्थापक ॲड. डॉ.अरुण जाधव, संस्थेच्या सचिवा उमाताई जाधव, वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष अतीश पारवे, पत्रकार धनराज पवार, पत्रकार सुजित धनवे,आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जामखेड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. महेश पाटील साहेब बोलताना म्हणाले की मोहा गावच्या पुण्यभूमीत राजश्री शाहू महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून निवारा बालगृहाचे रोपटे लावले आहे या रोपट्याचे रूपांतर वटवृक्षात होण्यासाठी मी कायम तत्परतेने प्रयत्न करणार आहे. बालगृहात आल्यानंतर नेहमीच भान हरपल्यासारखे वाटते. आमच्या कार्यापेक्षा या अनाथांच्या सेवेचे कार्य सर्वश्रेष्ठ आहे, हे समाजसेवेचे काम कारणं सोपं नाही मला या कामाचा नेहमीच आदर्श वाटतो. अरुण आबा जाधव यांची मी नेहमीचं दोन रुपे पाहतो आहे त्यांची वैचारिक पातळी खूप मोठी आहे म्हणूनच ते या 85 अनाथ लेकरांचे मायबाप आहेत.

जामखेड उपविभागीय अधिकारी मा.सायली ताई सोळंके बोलताना म्हणाल्या की आम्हा अधिकाऱ्याना घर असून देखील दिवाळी साजरी करण्यासाठी घरी जाता येत नाही परंतु आमची दिवाळी निवारा बालगृहातील अनाथ मुलांमध्ये साजरी होत आहे, यासारखा आनंद मला माझ्या आयुष्यात कधीच मिळाला नाही, बालगृहातील स्वच्छ परीसर पाहून अगदी मन भारावून गेले. या तुमच्या चांगल्या कामाला कोणतीही मोठी शक्ती थांबवू शकत नाही. बालगृहात आल्यानंतर कळते की या जगात आणखीन माणुसकी जिवंत आहे.

जामखेड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बोलताना म्हणाले की अनाथांची दिवाळी मला आज या निवारा बालगृहात पहावयास मिळाली या मुलांनां दिवाळीची पहिली आंघोळ घालण्याचे भाग्य मला मिळाले. अगदी हे पाहिल्यानंतर मला माझे लहानपणीची दिवाळी आठवली हे बालगृह अगदी समाजाला प्रेरणा देणारे आहे, या संस्थेमध्ये गरिबांना वंचितांना व्यासपीठ निर्माण करून दिले जाते, हे काम करणं म्हणजे अरुण जाधव यांच्या रूपाने या मुलांना देव माणूसच मिळाला आहे.
प्रारंभी उपस्थितांचे बालगृहातील मुलांच्या वतीने स्वागत गीत गाऊन व मान्यवरांचे शाल गुलाब गुच्छ आणि आम्ही घडलो हे संस्थेचे पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.
संस्थेचे संचालक बापू ओहोळ यांनी प्रास्ताविक केले. संतोष चव्हाण सर यांनी सूत्रसंचालन केले व वैजीनाथ केसकर यांनी आभार मानले.

या कार्यक्रमात नंदकुमार गाडे , तुकाराम शिंदे, दादासाहेब पुलवळे, गणपत कराळे, शहाणूर काळे, राहुल पवार, आलेस शिंदे, सुरेखा चव्हाण, रेशमा बागवान, द्वारकाताई पवार, राजू शिंदे, ऋषिकेश गायकवाड, प्रतीक्षा शिंदे, गौतमी गंगावणे, छाया मोरे, पायल मुळेकर, प्रियंका घोडेश्वर, आदी मान्यवर उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *