ग्रामसभेत विकास कामाची माहिती विचारली, सरपंचपतीची ग्रामस्थास मारहाण, विद्यमान सदस्य चंद्रकात बाबासाहेब उगले विरूद्ध खर्डा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
जामखेड प्रतिनिधी,
ग्रामसभेत झालेल्या कामांची माहिती विचारली असता तु बाजूला ये तुला सर्व कामाची माहीती देतो असे म्हणुन माझ्या जवळ येवून मला लाथाबक्यानी मारहाण केली व मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी घुलेवाडी येथील ग्रामस्थ परशुराम आजिनाथ शिकारे (वय २६), यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुक्यातील नायगाव ग्रामपंचायतच्या सरपंचपती व विद्यमान सदस्य चंद्रकात बाबासाहेब उगले यांच्या विरूद्ध खर्डा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खर्डा येथील ग्रामस्थांनी काही दिवसांपूर्वीच झालेल्या सरपंचपदाच्या निवडणुकीनंतर महिला सरपंचांच्या पतींना कारभार करण्यास प्रतिबंध करण्याची मागणी केली होती. त्यानंतर हा प्रकार पुढे आल्याने सरपंचा ऐवजी त्यांचे पती कारभार करत असतील तर काय होऊ शकते याचा प्रत्यय काल दि. ३ आॅगस्ट रोजी नायगाव येथे झालेल्या ग्रामसभेत पुढे आला आहे.
या बाबत सविस्तर असे की, काल दि. ३ आॅगस्ट रोजी जामखेड तालुक्यातील नायगाव येथे ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. त्यामधे नायगाव ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या घुलेवाडी येथील ग्रामस्थ परशुराम आजिनाथ शिकारे (वय २६), यांनी
ग्रामसभा चालू असताना ग्रामसभेत प्रश्न विचारण्यासाठी घुलेवाडी येथे झालेल्या कामाची लेखी माहितीची मागणी केली
त्यावेळी महिला सरपंच यांचे पती विद्यमान ग्रामपंचायत सदस्य चंद्रकात बाबासाहेब उगले यांस राग आल्याने त्यांनी फिर्यादीस
तु बाजूला ये तुला सर्व कामाची माहीती देतो असे म्हणुन व जवळ जाऊन यातील फिर्यादी ग्रामस्थ परशुराम आजिनाथ शिकारे यांना लाथाबक्यानी मारहाण केली व मारण्याची धमकी दिली. त्यानुसार सरपंच यांचे पती विद्यमान ग्रामपंचायत सदस्य चंद्रकात बाबासाहेब उगले विरूद्ध खर्डा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील नायगाव येथे ग्रामसभा सकाळी आयोजित करण्यात आली होती. यामध्ये मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. मात्र सरपंच गैरहजर होत्या. ग्रामसभा इनकॅमेरा सुरू होती. यावेळी परशुराम आजिनाथ शिकारे यांनी घुलेवाडी येथील कामाची माहिती मागितली असता सरपंच पती ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत बाबासाहेब उगले यांना राग आला व शिकारे यांना बाजूला घेऊन मारहाण केली या घटनेमुळे ग्रामस्थांनी ग्रामपंचायतला टाळे लावले यामुळे नायगाव सह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.