सैनिक हो तुमच्यासाठी….
उपक्रम उत्साहात संपन्न.
आजी-माजी सैनिकांच्या अडचणी सोडवण्यास आम्ही सदैव तयार – तहसीलदार योगेश चंद्रे
महसूल विभाग जामखेड
एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताह २०२३ उत्साहात साजरा होत आहे या निमित्ताने ५ ऑगस्ट रोजी” सैनिक हो तुमच्यासाठी ” उपक्रम तहसील कार्यालयात तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली विविध प्रशासकीय विभागाचे पदाधिकारी यांच्या समवेत मेळावा संपन्न झाला
यावेळी जामखेडचे कर्तव्यदक्ष तहसीलदार योगेश चंद्रे यांनी माजी आजी सैनिकांच्या विविध अडचणी समक्ष जाणून घेऊन विचार विनिमय करून अडचणी सोडवणार आहेत तसेच संबंधित सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना देऊन कार्यवाही करणार आहोत, असे मनोगत व्यक्त केले.
यावेळी प्रमुख उपस्थिती तहसीलदार योगेश चंद्रे , गटविकास अधिकारी प्रकाश पोळ दुय्यम निबंधक राहुल उगमले , कृषी विभागाचे गीते साहेब , महसूल सहाय्यक रमेश कांबळे ,माजी तालुका सैनिक संघटनेचे संस्थापक बजरंग डोके ,अध्यक्ष दिनकर भोरे, रावसाहेब जाधव , किसन चिलगल, कॅप्टन लक्ष्मण भोरे , अनिल देडे, मयूर भोसले,पो कॉ अविनाश ढेरे, आजी-माजी सैनिक व प्रशासकीय विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जामखेड मध्ये आजी माजी सैनिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सदैव तयार आहोत तसेच सर्व प्रशासकीय विभागाच्या वतीने त्यांना सहकार्य होईल सैनिकांना मदत करण्यासाठी आम्ही सदैव तयार आहोत. असे मनोगत तहसीलदार यांनी केले.
यावेळी आजी माजी सैनिकांनी जामखेडचे तहसीलदार योगेश चंद्रे व सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांचे या उपक्रमाबद्दल अभिनंदन करून आभार मानले.