*आमदार रोहित पवार यांनी घेतली पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट; जलजीवन मिशनच्या कामासंदर्भात भेटीत चर्चा*

*त्रुटी आढळून आलेल्या कामांचे दुरुस्तीकरण व सुरू न झालेली १७ कामे सुरू करावी याबाबत भेटीत सकारात्मक चर्चा*

कर्जत/ जामखेड | कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी नुकतीच पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची मुंबई भेट घेऊन जलजीवन मिशनच्या मतदारसंघातील कामासंदर्भात चर्चा केली.  कर्जत-जामखेड हे पर्जन्यमान कमी असलेले तालुके, शेतीला पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्याने शेतकरी नेहमी हतबल असत. तसेच महिलांना डोक्यावर हंडा घेऊन लांबून पाणी आणावं लागत असे. परंतु कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी मागच्या ४ वर्षांत मतदारसंघातील १०० टक्के गावांना मुबलक पाणी मिळावे यासाठी प्रयत्न केले. जलजीवन मिशन अंतर्गत DPR, सर्वे, प्राथमिक परवानग्या, जिल्हा स्तरावर पाठपुरावा, राज्य शासनाकडे पाठपुरावा आणि प्रत्यक्ष काम सुरु होण्यापर्यंत सर्व प्रकारचा पाठपुरावा रोहित पवार यांनी केला.

रोहित पवार आमदार झाल्यानंतर जलजीवनच्या कामांसाठी आपली एक वेगळी टीम मतदारसंघात तयार केली. प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यानंतर काही ठिकाणी अतीशय खराब पद्धतीचे काम झालेले पाहायला मिळाले. एकूण 170 कामांपैकी 25 कामांमध्ये त्रुटी आढळून आल्या त्यानंतर आमदार रोहित पवार यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भेटून तीन ते चार तास बैठक करुन खराब कामांचे सादरीकरण केले. त्यानंतर 4 कामांचे दुरुस्तीकरन झाले. परंतु, अजूनही 21 कामाचं दुरुस्तीकरण होणं बाकी आहे. त्याचबरोबर सर्व पाठपुरावा करूनही अजुन 17 कामे सुरू होणे बाकी आहे. याच अनुषंगाने आमदार रोहित पवार यांनी ग्रामीण पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन ही उर्वरित कामं लवकरात लवकर मार्गी लावावीत अशी विनंती पत्राद्वारे प्रत्यक्ष भेटून केली आहे.

जलजीवन मिशन अंतर्गत 170 कामांसाठी 314.07 कोटी रुपये निधी आमदार रोहित पवार यांनी पाठपुरावा करून मंजुर करून घेतला त्यापैकी खर्डा गावासाठी एकूण 17 कोटी रुपये, कोंभळी व इतर 11 गावांसाठी 32.09 कोटी रुपये, मिरजगावसाठी 22.85 कोटी रुपये, नान्नजसाठी 4.50 कोटी रुपये, जवळा गावासाठी 10.82 कोटी रुपये एवढा निधी आमदार रोहित पवार यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून मंजूर करून आणला. त्याचबरोबर जामखेड नळ पाणीपुरवठा योजनेसाठी 168 कोटी रुपये निधीदेखील मंजूर करून आणला आहे. ग्रामपंचायत आणि नागरिक यांच्यावरील वीजेच्या बिलाचा ताण कमी व्हावा यासाठी मतदारसंघात ग्रामपंचायत ठिकाणी सोलर पॅनल बसवण्यात आले आहेत. परंतु अजूनही 17 गावं सोलर योजनेपासून वंचित आहेत त्याचेही काम लवकरात लवकर सुरू करावे, अशीही मागणी आमदार रोहित पवार यांनी मंत्री महोदयांना भेटून केली आहे.

रोहित पवार यांनी नेहमीच नागरिक आणि पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन 100 टक्के गावं जलजीवन मिशनच्या अंतर्गत घेण्यासाठी प्रयत्न केला. ज्या नागरिकांकडून तक्रार येईल त्यांना लगेच योग्य मदत करुन तो विषय मार्गी लावला जात आहे. महिलांच्या डोक्यावरील हंडा कायमचा उतरवला जाईल त्याबरोबर शेतीला मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा केला जाईल असा शब्द रोहित पवार यांनी नागरिकांना दिला होता. तोच शब्द खरा ठरवत मागच्या चार वर्षांत कोट्यवधी रुपयांची कामं जलजीवनच्या माध्यमातून कर्जत जामखेडमध्ये झालेली आहेत. आता पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची आमदार रोहित पवार यांनी भेट घेतल्यामुळे उर्वरित कामेही मार्गी लागतील आणि कामांची दुरुस्ती देखील लवकरच पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.

      निवडणुकीच्या काळामध्ये महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरवणार असा शब्द मी दिला होता. त्याच अनुषंगाने जलजीवन योजनेत मतदारसंघातील सर्वच गावांचा समावेश करून घेतला. तसेच आपण पाठपुरावा केला आणि हे काम होत असताना ते चांगल्या प्रतीचे व्हावं कारण पुढील 30 वर्षाचे नियोजन यामध्ये आहे. आणि सामान्य माणसाला कोणतेही अडचण येऊ नये या दृष्टीने आपण प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. मंत्री महोदयांना भेटून जलजीवनची कामे मार्गी लावावी तसेच 17 गावे जी सोलार योजनेपासून वंचित आहेत. ती देखील सोलार योजनेत घेऊन सहकार्य करण्याची विनंती त्यांना केली.

– *आमदार रोहित पवार*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *