शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जामखेड येथे तालुकास्तरीय तंत्रप्रदर्शन-2023 संपन्न
जामखेड प्रतिनिधी,
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण जामखेड येथे तालुकास्तरीय तंत्रप्रदर्शन 2023 स्पर्धा संपन्न व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांच्या मार्फत आयटीआय किमान कौशल्य, द्विलक्षी अभ्यासक्रम व शासकीय तांत्रिक विद्यालय इत्यादी .
यांच्या मार्फत विविध व्यवसाय अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण दिले जातेय व्यवसाय अभ्यासक्रमामध्ये प्राप्त कौशल्याचा वापर करूनआत्मसात केलेले ज्ञानव कौशल्य वापरूनप्रशिक्षण संस्थेमधील संशोधक यांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच त्यांच्यातील नाविन्यता शोधण्यासाठी प्रतिवर्षी विविध स्तरावर ती तंत्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सभागृहामध्ये या तंत्र प्रदर्शनाचेआयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटनआयएमसी सदस्य श्री. प्रवीण पोपटराव उगले यांच्या हस्ते रिबीन कट करून करण्यात आलेया तंत्र प्रदर्शनामध्ये औद्योगिक औद्योगिक प्रशिक्षण संस्थथा जामखेड व श्री छत्रपती कनिष्ठ महाविद्यालय खर्डा येथील विविध व्यवसाय अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांचे19 वर्किंग मॉडल्स समाविष्ट करण्यात आले होते
या तंत्र प्रदर्शनास परीक्षक म्हणून श्री उगले साहेब साई ट्रान्सफॉर्मर जामखेड व श्री सी व्ही बारटक्के पूर्णवेळ शिक्षक : इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी श्री छत्रपती कनिष्ठ महाविद्यालय ,खर्डा. यांनी काम केले या कार्यक्रमास श्री हुलगुंडे सर महावितरण शासकीय ठेकेदार माननीय प्राचार्य श्री. वाघ साहेब यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचेशाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले या तंत्र प्रदर्शनातून तालुकास्तरीय प्रथम क्रमांक म्हणून एक्सीलेटर लॉक व फॅक्ट लॉक व्यवसाय यांत्रिक मोटार गाडी व द्वितीय क्रमांक म्हणून मिनीफवारणी यंत्रव्यवसाय संधाता प्रकल्पाची निवड जिल्हास्तरीय स्पर्धे करता करण्यात आली.
उपस्थित मान्यवरांनी सर्व सहभागी प्रशिक्षणार्थ्यांचे कौतुक केले तसेच मोलाचे मार्गदर्शन देखील केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेतील गटनिर्देशक गायकवाड के जी श्री नितनवरे सर शिल्प निदेशक शेख एन एम सर,देवगुडे सर तुमेदवार सर सानप सर जायभाय सर घाऊड सर शेळके सर देवढे सर तवटे सर शिंदे सर कुनहाळे सर व चतुर्थ श्रेणी कर्मचारी तसेच सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी मोलाचे परिश्रम घेतले.