श्री दत्त जन्म सोहळयानिमित्त हाळगाव येथील
तिर्थक्षेत्र सिध्देश्वर दत्त संस्थानामध्ये अखंड हरिनाम सोहळा.
जामखेड –
श्री दत्त जयंतीनिमित्त तालुक्यातील हाळगाव येथील तिर्थक्षेत्र सिध्देश्वर दत्त संस्थानामध्ये श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
सिध्देश्वर दत्त संस्थानचे अध्यक्ष दादा महाराज रंधवे यांच्या मार्गदर्शनाखाली होणारा हा अखंड हरिनाम सप्ताह रामायणाचार्य बाबा महाराज ढवळे यांच्या प्रेरणेने होत आहे.तर निरा-नरसिंहपुर अंकुश महाराज रणखांबे व्यासपीठ चालक असुन,त्यांचे सात दिवस संतचरित्र होणार आहे. २० डिसेंबर ते २७ डिसेंबर दरम्यान पहाटे काकडा आरती, विष्णु सहस्रनाम, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, संतचरित्र, हरिपाठ,हरिकिर्तन व नंतर हरिजागर असा दैनंदिन कार्यक्रम आहे.
या सप्ताहात भरत महाराज औटी, गणेश महाराज धुमाळ, माऊली महाराज म्हस्के, दिनानाथ महाराज सावंत, सुनील महाराज झांबरे, सुखदेव महाराज ननवरे, गहिनीनाथ महाराज खेडकर यांची किर्तनसेवा होणार आहे. दरम्यान दत्त जन्म सोहळयानिमित्त मंगळवारी (ता.२६) सायंकाळी अंकुश महाराज रणखांबे यांचे किर्तन होणार आहे. तर २७ डिसेंबर वेदांताचार्य बापुसाहेब महाराज ढगे यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. यानंतर भाविकांना महाप्रसाद देण्यात येणार आहे.
या सप्ताहात कोर्टी (ता.करमाळा) येथील श्री संत हरि हरि बाबा वारकरी शिक्षण संस्थेतील बाल वारकरी हरिपाठ आणि किर्तनासाठी साथ संगत करणार आहेत.
या सप्ताहानिमित्त होणा-या किर्तनसेवेचा लाभ घेण्याचे आवाहन दत्त संस्थानचे अध्यक्ष दादा महाराज रंधवे यांनी केले आहे.
१) हभप दादा महाराज रंधवे
अध्यक्ष- श्री सिध्देश्वर दत्त संस्थान,हाळगाव
२) हाळगाव ता. जामखेड येथील दत्त देवस्थानमधील औदुंबर वृक्ष व श्री दत्त पादुका