*इम्रान पानसरे क्लासिक उत्तर महाराष्ट्र राज्य स्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा जामखेड येथे संपन्न…*_

*नाशिकचा मयुर शिंदे ठरला चषकाचा मानकरी तर बेस्ट पोजर म्हणून नाशिकच्याच साकीब शेख ची निवड ..*

जामखेड प्रतिनिधी

चांगल्या होतकरू स्पर्धकांना न्याय देण्याचे व त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून या स्पर्धेच्या निमित्ताने झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्रात या स्पर्धेचा नावलौकिक प्राप्त होईल आणि एक चांगला सर्वधर्म समभाव हा संदेश महाराष्ट्रत जाईल.असे मत प्राध्यापक मधुकर राळेभात यांनी व्यक्त केले.

रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र बाॅडी बिल्डर असोसिएशन व जामखेड तालुका बाॅडी बिल्डर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने उत्तर महाराष्ट्र स्तरीय इम्रान पानसरे क्लासिक जिल्हा स्तरीय टाॅप टेन चषक चे आयोजन केले होते. कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मयुर शिंदे उत्तर महाराष्ट्र राज्य स्तरीय इम्रान पानसरे क्लासिक चषकाचा मानकरी ठरला.

 

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून इम्रान भाई पानसरे,प्रा. मधुकर राळेभात, जिल्हा उपाध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष जयसिंग उगले, नगरसेवक अमित चिंतामणी, मुस्लिम पंच कमिटी चे अध्यक्ष अजहर भाई काझी,सय्यद मुख्तार (टेलर), इस्माईल सय्यद,उमर कुरेशी,आझम पानसरे, उत्तर महाराष्ट्र बाॅडी बिल्डींगचे अध्यक्ष कल्याण शेठ गरुड, उद्योगपती संतोष पवार, पोपट नाना राळेभात,भानुदास बोराटे ,गुलाब जांभळे,उमर कुरेशी, पवन राळेभात,नासिर बिल्डर, इम्रान कुरेशी, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त मधुकर गायकवाड, इम्तियाज पठाण

उपाध्यक्ष अबरार अन्सारी, शकील शेख, डॉ.देवकाते, डॉ.सचिन काकडे, डॉ.प्रशांत गायकवाड, दिनेश राळेभात (शहराध्यक्ष प्रहार),सरफराज पठाण (एस पी फिटनेस क्लब),वसीम भाई (बिल्डर ),पाॅवर लिफ्टिंग चे महाराष्ट्र अध्यक्ष दगडू गव्हाळे, ऋत्वीक कुटे, आदी मान्यवर उपस्थित होते.प्रास्ताविक नय्युम भाई सुभेदार यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमंत निकम महाराज यांनी केले व आभार इम्रान सर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *