*कालिका पोदार लर्न स्कूल मध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा थाटामटात निरोप समारंभ*

जामखेड प्रतिनिधी,

कालिका पोदार लर्न स्कुल येथे नर्सरी ते इयत्ता 10 वी पर्यंतचे वर्ग भरले जातात शिक्षणाबरोबरच संस्कृती देखील जपण्याचे काम केले जाते.आज कालिका पोदार लर्न स्कूल मध्ये आगळ्यावेगळ्या पद्धतीने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता.

इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सायंकाळच्या रम्य वातावरणात नेत्रदिपक सजावटीत कार्यक्रमाला सुरुवात झाली. दहावीच्या विद्यार्थ्यांचे पुष्पवर्षावांनी स्वागत करून मान्यवारांच्या हस्ते सरस्वती चे पूजन व दीपप्रज्वलाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रथम इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची रँपवॉक स्पर्धा झाली.त्यानंतर नववीच्या विद्यार्थ्यांनी विविधरंगी कार्यक्रमाचे सादरीकरण केले.त्यामध्ये विविध नृत्य,नाटक,व मनोरंजक खेळ सादर केले.

यांचबरोबर दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.त्यामध्ये त्यांनी शाळेच्या आठवणींना उजाळा देऊन त्यांच्या साठी शाळेचे असणारे महत्व विषद केले व कृतज्ञताही व्यक्त केली.त्यानंतर मा.संस्थापक व मा. मुख्याध्यापकांच्या हस्ते दहावीच्या विद्यार्थ्यांना भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या.

प्राचार्य मा.श्री प्रशांत जोशी म्हणाले की इयत्ता दहावीचे विध्यार्थी खूप हुशार आहेत आणि हे पुढे जाऊन चांगल्या टक्क्याने उत्तीर्ण होऊन वेगवेगळ्या क्षेत्रात शाळेचे नाव नवलोकिक करतील. ह्या विध्यार्थ्यानी चांगली मेहनत घेतली आहे नक्कीच परीक्षेत चांगला यश मिळवतील आणि शाळेचं नाव महराष्ट्रात करतील.

पुढे बोलताना प्राचार्य जोशी म्हणाले इयत्ता दहावीच्या विध्यार्थ्यांसाठी विविध विषयांवर तज्ज्ञचे मार्गदर्शन, नीट ची तयारी मेडिकल इंजिनिअर या विषयीचे व्याख्यान व मार्गदर्शने आयोजित कली होती विध्यार्थ्यांना पुढे कशात करिअर करायचे आहे त्यावर मार्गदर्शन घेण्यात आले होते यामुळे नक्कीच पुढील शिक्षण घेताना विध्यार्थ्यांना फायदा होईल व कधीही स्कुल या विध्यार्थ्यांच्या पाठीमागे खंबीर पणे उभे राहील.आमच्या स्कुलची पहिली दहावीची बॅच शाळेतून बाहेर पडत आहे खरच खुप आनंद होत आहे खूप हुशार आणि शांत विध्यार्थी आपलं भविष्य घेऊन येथून बाहेर पडत आहेत नक्कीच पुढील काळात हे विध्यार्थी देशपातळीवर चमकतील अधिकारी,इंजिनिअर,व चांगले नागरिक घडतील अशी मला आशा आहे आणि यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा.

शाळेचे संस्थापक सागर अंदुरे सर , निलेश तवटे सर, यांनी देखील विध्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी प्राचार्य प्रशांत जोशी, शाळेचे संस्थापक सागर अंदुरे सर , निलेश तवटे सर,सर्व शिक्षक कर्मचारी वृंद व दहावीचे विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी कार्यक्रमांची सांगता आभार व सुरुची भोजनाने झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *