*स्वस्तात जमीन व सोने देतो म्हणून पुण्यातील व्यावसायिकाची १० लाखाची लूट*

जामखेड प्रतिनिधी,

पुणे येथील व्यावसायिकाला स्वस्तात सोन्याचे दागिने देण्याचे आमिष दाखवून लुटण्यात आले. ही घटना जामखेड तालुक्यातील राजुरी शिवारात ३० नोव्हेंबर ८ डिसेंबर दरम्यान घडली.
या प्रकरणी रघुनाथ ऋषिकेश शिंदे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार जामखेड पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३९५, १२० (ब), ५०६ प्रमाणे ६ इसमांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत.

कुशी भोसले, कारभारी भोसले यांच्यासह ४ अनोळखी इसमांचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे. दोन अनोळखी इसम ३० ते ३५ आणि इतर दोघे अनोळखी इसम २५ ते ३० वयोगटातील आहेत.

पुणे येथील व्यापाऱ्यास स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून जामखेड तालुक्यातील राजुरी शिवारात बोलविण्यात आले. तेथे आल्यानंतर व्यावसायिकास काठी व हाताने बेदम मारहाण करण्यात आली.

त्याचप्रमाणे चाकूने जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. व्यावसायिकाकडून १० लाख ११ हजार रुपयांची रोख रक्कम व मोबाईल हॅण्डसेट हिसकावून घेतला.

या घटनेनंतर कर्जत उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक वाखारे, जामखेडचे पोनि. महेश पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. पुढील तपास सपोनि. संगीता गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *