एन् टी व्ही न्युज च्या ‘क्रांती’ दिवाळी विषेशांकाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरिंच्या हस्थे प्रकाशन.

पत्रकारितेतुन सामाजिक कार्य अन् जनजागृती उल्लेखनिय बाब-गडकरी

प्रतिनिधी

निष्पक्ष पत्रकारिता आणि त्यामाध्यमातून होणारे समाजिक कार्य व जनजागृती उल्लेखनीय बाब आहे असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी एन टी व्ही वृत्तवाहिनीच्या दीपावली विषेशांक ‘क्रांती’ च्या प्रकाशन सोहळ्यात करत बालविवाह रोखून अल्पवयीन मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणान्याचे कार्य करत असल्याबाबत कौतुकही केले.
प्रतीवर्षाप्रमाणे यंदाही एन टी व्ही तर्फे सामाजिक प्रबोधनात्मक अंक “समग्र दृष्टिकोनातून घडऊया क्रांती” यां शीर्षकाखाली पुस्तक काढले, या पुस्तकाचे दि 10 रोजी नागपूर येथे श्री गडकरी यांच्या कार्यालयात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले.
यावेळी श्री नितीन गडकरी यांच्यासह सोलपूर मतदारसंघाचे भाजप आमदार तथा लोकमंगल समुहाचे संस्थापक व अध्यक्ष सुभाष देशमुख, एन टी व्ही वृत्तवाहिनीचे संपादक इकबाल शेख, विभागीय प्रतिनिधी सचिन बिद्री,व्यवस्थापक रजत दायमा, धाराशिव प्रतिनिधी अयुब शेख,भा.ज.पा,माजी सैनिक आघाडी नागपूरचे उपाध्यक्ष राम कोरकेनागपूर प्रतिनिधी अनिल बालपांडे,सहदेव वैद्य आदिसह इतर मान्यवरांची उपस्थिती होती.
पत्रकारितेचा वारसा पाहिला तर फक्त बातम्या लावणे पुरेसे ठरत नाही. त्या बातमीच्या संदर्भातील सर्वंकष भूमिका मांडली जाणे महत्त्वाचे आहे.पत्रकारिता बंधनमुक्त असावी आणि अशी निर्भीड बंधनमुक्त भूमिका घेण्याचे स्वातंत्र्य एन टी व्ही ने जपलेले आहे असे व्यवस्थापक रजत दायमा यांनी यावेळी आपल्या प्रास्ताविकात मांडत सामाजिक व प्रबोधनात्काम कार्याचा लेखाजोखा मांडला.

दरम्यान धाराशिव जिल्ह्याच्या तत्कालीन जिल्हाधिकारी तथा विद्यमान बीड जिल्हाधिकारी आयएएस दिपा मुधोळ-मुंडे यांनी धाराशिव जिल्ह्यात सुरु केलेल्या बालविवाह, हुंडाप्रथा आणि स्त्रीभ्रूण हत्या विरोधी चळवळ व त्यांच्याकार्याप्रणालीबाबत आणि चांगल्या कामाला नेहमी प्रोत्साहित करणारे तत्कालीन जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांच्या कार्याबाबतही मंत्रीमहोदयांसमक्ष चर्चा झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *