विकास केला म्हणता तर रडता कशाला! रडल्याने सहानुभूती मिळत नसते – चेअरमन अजिनाथ हजारे

जामखेड प्रतिनिधी

ग्रामपंचायतीत विकास केला म्हणता, मग रडायची काय गरज आहे. त्यामूळे रडून भावनिक होण्याचा डाव या वर्षी फसणार आहे. भावनिक होऊन सहानुभूती मिळत नसते तर विकास कामे करुन जनतेची मने जिंकावी लागतात असा टोला शेतकरी ग्रामविकास आघाडीचे प्रमुख मार्गदर्शक चेअरमन अजिनाथ हजारे यांनी मुलाखती दरम्यान विरोधकांना लावला.

 

विकासाच्या मुद्यावर बोलताना चेअरमन अजिनाथ हजारे म्हणाले की शेतकरी ग्रामविकास आघाडी जवळा पॅनलच्या माध्यमातून आपण ग्रामपंचायत निवडणुकीला सामोरे जात आहोत. आपला एजेंडा जवळा गावाच्या सर्वांगीन विकासासाठी आहे. शेतकरी ग्रामविकास आघाडीमध्ये सर्वच क्षेत्रातील समविचारी लोक एकत्र येऊन एकजुटीने काम करत आहेत. सर्व उमेदवार गावाच्या विकासाबाबत प्रामाणिक, वचनबद्ध, कटीबध्द राहणारे आहेत. गावाच्या विकासाच्या मूलभूत सुविधा रस्ते पाणी विज शिक्षण, आरोग्य, याबरोबरच सामान्य माणूसाचे आर्थिक सबलीकरण करण्यावर भर दिला जाणार आहे. गावाची स्वच्छता, धार्मिक सामाजिक सलोखा अशा विविध विषयांवर एकजुटीने आपण काम करणार आहे.
जवळा गावातील जिल्हा परिषद शाळांचा पीएम श्री योजनेत समावेश करण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. शाळेच्या संरक्षण भींतीचे काम व सुरक्षेच्या दृष्टीने सी सी टीव्ही बसविणे, प्रामुख्याने जवळा गावात उच्च शिक्षण व व्यवसायायाभिमुख शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

बाजारपेठेला वाव मिळावा म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार समिती मंजूरीसाठी प्रयत्न करणार. राष्ट्रीयीकृत बँक गावात आणण्याचे प्रयत्न करणार. राज्य व केंद्र सरकारच्या आरोग्याच्या सुविधा सर्वांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करणार. आरोग्याच्या कोणत्याही योजनेतून गावातील माणुस वंचित राहणार नाही याला प्राधान्य देणार. गावातील वयोवृद्ध लोकांना विरंगुळा मिळण्यासाठी गावात नाना नानी पार्क तयार करणार. शासनाच्या शेतीविषयक विविध योजना गावात राबवुन शेती सुजलाम सूफलाम करत शेतकर्‍यांना आर्थिकदृष्टय़ा सक्षम करण्याचा प्रयत्न करणार आहोत.

चौकट

लोकनेते स्व. श्रीरंगभाऊ कोल्हे, स्व किसनराव दळवी व स्व. प्रदिप (आबा) पाटील यांच्या विचारांचा वारसा घेऊन या पॅनेलने तरुण उमेदवारांना संधी दिली आहे. शेतकरी ग्रामविकास आघाडी मार्गदर्शक म्हणून दत्तात्रय कोल्हे, प्रदिप दळवी, राजू महाजन, आर. डी. पवार, आजीनाथ हजारे, डॉ. पवार, दिपक पाटील, राजू राऊत, शहाजी पाटील पवार, राजू मोटे, पांडुरंग वाळके, आयुब शेख, हुसेन सय्यद यांच्या सह अनेक ज्येष्ठ ग्रामस्थ काम करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *