आमदार रोहित पवार यांचा उपोषणास बसलेल्या चौंडी येथे यशवंत सेना संघटनेला पाठिंबा…

जो पर्यंत धनगर समाजाला आरक्षण चे वटहुकूम काढीत नाही तो पर्यंत उपोषण सुरूच राहणार – अक्षय शिंदे

जामखेड प्रतिनिधी –

महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या आरक्षणाचा वटहुकूम काढावा या मागणीसाठी यशवंत सेनेचे पदाधिकारी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थळ चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मारकासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. यावेळी कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आ.रोहित पवार यांनी या अंदोलकांची भेट घेतली व धनगर समाजाच्या अडचणी सोडवण्यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की, राज्य सरकारला विनंती आहे कि मराठा आरक्षण, धनगर आरक्षण तसेच लिगायत आरक्षण हे सगळे विषय मार्ग लावयची असतील तर योगा योगा ने खास अधिवेशन सष्टेंबर मध्ये घ्यावा. जसा EWS कोटा 50% च्या पुढे 10% दिला तसच मराठा आरक्षणला, धनगर समाजाला दयावा अशी आम्ही विनंती करतो.

पण त्याला थाडस लागते ते धाडस राज्यसरकार कडे नाही. भाजप सरकार नेहमी आरक्षणाच्या विरोध्दात असतात तसेच राजकारण हे भाजपच करतो येथे यशवंत सेना ही एक मोठी संघटना राज्यामध्ये धनगराच्या हितासाठी काम करते. त्याचे उपोषण चौडी मध्ये सुरू आहे. जो पर्यंत त्यांना न्याय मिळत नाही तो पर्यत ते उठणार नाही. कर्जत व जामखेड च्या अनेक ग्रामपंचायतानीही पाठींबा दिला आहे. या दोन्ही तालुक्यातील नेत्यांनीही त्यांना पाठींबा दिला आहे.तसेच अक्षय शिंदे हे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे खरे वंशच आहे ते सुद्धा येथे आहेत. त्यांनी सुद्धा यशवंत सेना या संघटनेला पाठींबा दिला आहे.यावेळी त्यांच्या मागण्या जाणून घेत उपोषणाला पाठिंबा दिला आणि तब्येतीची काळजी घेण्याची विनंती केली.

यावेळी माजी मंत्री व यशवंत सेनेचे बाळासाहेब दोडतले, माणिकराव दांगडे, अक्षय शिंदे व समाजबंधु यांच्यासह जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील, ए. पी. आय. संगीता गिरी मँडम, पोलिस कॉन्स्टेबल इंगळे, पोलिस कॉन्स्टेबल काळाणे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते प्रा. मधुकर राळेभात, रमेश दादा आजबे, मोहन पवार, पोले नाना,अविनाश शिंदे, राजेंद्र पवार, कुंडल राळेभात, प्रकाश सदाफुले, किसनराव ढवळे, प्रवीण उगले, विश्वनाथ राऊत कार्यकर्ते व पदाधिकारी स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

अक्षय शिन्दे चौकट-

काही दिवासापासून अहिल्याबाई नगर यासाठी सुद्धा आम्ही जिल्हाभर आंदोलन काढले आहे. काल पासून आम्ही आमरण उपोषणास चौडी मध्ये बसलो आहे. 18 ते 22 या पाच दिवस दिल्ली मध्ये अधिवेशन चालु होणार आहे. या अधिवेशनामध्ये राज्यशासनाने केद्राला विनती करून त्या अधिवेशनात धनगर समाजाला वटहुकूम काढावा अशी विनंती अक्षय शिन्दे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *