ज्योती क्रांती सावित्रीबाई फुले यांची जयंती व बालिका दिवस श्री नागेश विद्यालय संकुलात उत्साहात संपन्न.

जामखेड प्रतिनिधी,

रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालय व कन्या विद्यालय मध्ये ज्योती क्रांती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ रत्नमाला विनायक राऊत तर प्रमुख उपस्थिती नागेश विद्यालय स्कूल कमिटी सदस्य हरिभाऊ बेलेकर उद्योजक विनायक राऊत, प्राचार्य मडके बी के मुख्याध्यापिका चौधरी केडी पर्यवेक्षक कोकाटे व्ही के., पर्यवेक्षक संजय हजारे, ताहेर शेख, दशरथ निमोणकर , सौ साळुंके एम बी ,श्रीम ससाणे व्ही एस, लोंढे मॅडम, मयुर भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी विद्यालयाच्या वतीने महिला शिक्षिकांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर भाषणे केली.
कन्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सावित्रीबाई व ज्योतिबा फुले यांच्या जीवनावरील नाटिकेचे सादरीकरण केले.

नागेश विद्यालय स्कूल कमिटी सदस्य हरिभाऊ बेलेकर यांनी शुभेच्छा दिल्या. प्राचार्य मडके बीके यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला उजाळा दिला.
नागेश विद्यालय स्कूल कमिटी सदस्य उद्योजक विनायक राऊत यांनी सावित्रीबाई फुले यांचे कार्याची माहिती दिली अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचे कार्य अविरत चालू ठेवले.असे मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ रत्नमाला विनायक राऊत यांनी मनोगतामध्ये आजच्या मुलींनी सावित्रीबाई फुले यांचा आदर्श समोर ठेवून शिक्षण घेऊन प्रगती केली पाहिजे असे मनोगत व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक संजय हजारे यांनी केले.
सूत्रसंचालन संतोष सरसमकर आभार प्रदर्शन कोकाटे व्ही के यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *