जामखेड प्रतिनिधी –

आज जामखेड येथे मुस्लिम बांधवांचा रमजान ईद हा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. रमजान ईद निमित्ताने जामखेड येथील इदगाह मैदानात रमजान ईद ची नमाज संपन्न झाली या रमजान ईद निमित्त अनेक मुस्लिम बांधवांनी रमजान ईद ची नमाज अदा केली. मौलाना मुफ्ती अफजल, मौलाना खलील कासमी हाफिज समीर च्या वतीने दुवा (प्रथना) करण्यात आली. तसेच नमाज अदा केल्यानंतर एकमेकांची गळा भेट झाली.

 

 

रमजान ईद च्या निमित्ताने अनेक मुस्लिम बांधव हे एकत्रित आले व आनंदाने ईद साजरी केली . रमजान हा महिना मुस्लिमांसाठी पवित्र असा महिना समजला जातो या रमजान महिन्यात मुस्लिम महिन्याभराचा उपवास करत असतात नमाज तसेच जकात, फितरा असे अनेक विविध उपक्रम या रमजान महिन्यात राबविले जातात, अनाथ, गरीब कुटुंबांना मदत व्हावी यासाठी जकात व फितरा देणे बंधनकारक असते आज प्रत्येक मुस्लिम बांधव हा उत्साहाने व आनंदाने रमजान ईद साजरी करत असतो.

यावेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला. तसेच उपस्थित तहसिलदार योगेश चंद्रे, मधुकर आबा राळेभात, अरुण (आबा) जाधव, ढेपे सर, अमिंत चिंतामणी, बिबिषन धनवडे, डाँ. भास्कर मोरे, प्रा. कैलास माने, अमित जाधव, यावेळी राजकीय पुढारी मोठ्या संख्येने उपस्थित होते व सर्व मुस्लीम बांधवांना शुभेच्छा दिल्या व ईद मुबारक ची भेट दिली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *