जामखेड मध्ये पहिल्यांदाच लेफ्ट साइड हेमिथायरॉइडेक्टॉमी सर्जरी
जामखेड प्रतिनिधी,
जामखेड शहरातील युनिटी हॉस्पिटल येथे श्री हॉस्पिटल चे संचालक डॉ अमित पळवदे यांनी जनरल ऍनेस्थेसिया अंतर्गत डाव्या बाजूची हेमिथायरॉइडेक्टॉमी शस्त्रक्रिया जामखेड मध्ये प्रथमच करण्यात आली.
या शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांना असिस्टंट म्हणून डॉ. सचिन काकडे यांनी मदत केली तर भुलतज्ञ डॉ. मनोज शिंदे व हॉस्पिटलचे संचालक डॉ. टिपू सय्यद यांनी जबाबदारी पार पाडली.
पेशन्ट बिस्मिल्ला शेख रा.कर्जत वय २९ जवळजवळ एक वर्षापासून डाव्या बाजूला थायरॉईड सूज असल्याची तक्रार होती थायरॉईड जखम असल्याचे निदान झाले.
यावेळी डॉ पळवदे शस्रक्रियेनंतर बोलताना म्हणाले ही पाहिजे तेव्हडी शस्रक्रिया सोपी नव्हती पण आम्ही पार केली व रुग्णला बरे केले शस्त्रक्रियेनंतर
दीर्घकालीन आजारातून आता त्या मुक्त झाले
शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती स्थिर आहे.
कोणत्याही पोस्टऑपरेटिव्ह गुंतागुंत
नसताना तिचा आवाज पूर्णपणे सामान्य आहे. यापूर्वी रुग्णांना उपचारासाठी अहमदनगर, पुणे इतर ठिकाणी जावे लागत होते.पंरतु अशा रुग्णांना उपचारासाठी युनिटी
हॉस्पिटल व श्री हॉस्पिटल या ठिकाणी उपचार व शस्त्रक्रिया होत आहेत.
या शस्त्रक्रियेसाठी तब्ब्ल २ तास वेळ लागला
असून शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली आहे.