गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांचा दणका , कर्तव्यात कसूर करणारा शिक्षक नितिन बोराटे निलंबित…
जामखेड :- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणी ता. जामखेड येथील पदवीधर शिक्षक श्री नितीन सोपान बोराटे हे वारंवार गैरहजर राहून कर्तव्यात कसूर करीत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. तसेच गावातील लोकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी होत्या
त्याची दखल घेत गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर यांना अहवाल सादर केला होता त्यांची गंभीर दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी श्री . आशिष येरेकर यांनी बोराटे यांना त्वरीत सेवेतून निलंबीत केले आहे .
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नितीन बोराटे यांनी यापूर्वीही कर्तव्यात कसूर व गैरवर्तन केल्याने जामखेड तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री . प्रकाश पोळ यांनी त्यांच्या दोन वेतनवाढी तात्पुरत्या स्वरूपात बंद केल्या होत्या तरीही त्यांच्या वर्तनात व कर्तव्यात कोणताही बदल झाला नाही .
बोराटे यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा ( शिस्त व अपिल )नियम १९६४ चे भाग २ मधील नियम ३ चा भंग केला असल्याने त्यांना मुख्यकार्यकारी अधिकारी ,अ : . नगर यांनी निलंबित केले असून त्यांना निलंबन काळात गटशिक्षणाधिकारी कार्यालय पंचायत समिती शेवगांव हे मुख्यालय देण्यात आले आहे. गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे अँक्शन मोडवर आल्यामुळे जामखेड तालुक्यातील कामचुकार शिक्षकांचे धाबे दणाणले आहे .