Home राजकीय बातमी भाजप राष्ट्रवादी आता पांडूरंग माने यांच्या हाती धनुष्यबाण ,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या...

भाजप राष्ट्रवादी आता पांडूरंग माने यांच्या हाती धनुष्यबाण ,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा

0
5

भाजप राष्ट्रवादी आता पांडूरंग माने यांच्या हाती धनुष्यबाण ,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा

जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील राजकीय क्षेत्रातील सक्रिय कार्यकर्ते पांडूरंग माने यांनी शिवसेना पक्षात अधिकृत व जाहीर प्रवेश केला आहे. मुंबई येथील उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे मुख्य नेते मा. एकनाथ शिंदे यांच्या ‘नंदनवन’ या अधिकृत निवासस्थानी त्यांच्या शुभहस्ते पक्षप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पांडूरंग माने यांनी यापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चामध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी सचिव म्हणून सुमारे सव्वा वर्ष कार्य केले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) मध्ये व्हीजेएनटी (VJNT) विभाग प्रमुख म्हणून जवळपास दीड वर्ष जबाबदारी सांभाळली. या पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

पक्षप्रवेशानंतर बोलताना पांडूरंग माने म्हणाले, “भक्ती आणि शक्तीच्या अधिष्ठानाने प्रेरित होऊन जनसेवेचे कार्य अधिक प्रभावीपणे करण्यासाठी मी शिवसेनेत प्रवेश केला आहे. राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्यांच्या हितासाठी, विकासासाठी आणि जनतेच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रामाणिकपणे कार्य करणार आहे.”
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पांडूरंग माने यांच्या सामाजिक व राजकीय कार्याची दखल घेत त्यांचे शिवसेना परिवारात स्वागत केले.

जनतेच्या प्रश्नांवर अधिक प्रभावीपणे काम करण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून संधी मिळाल्याबद्दल पांडूरंग माने यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांचे मनःपूर्वक आभार मानले.
या पक्षप्रवेश सोहळ्याला शिवसेना युवा नेते आकाश बाफना, शिवसेना जामखेड तालुका उपप्रमुख नितीन कोल्हे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते कैलास जाधव यांच्यासह विविध पदाधिकारी, शिवसैनिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी पांडूरंग माने यांनी आपल्या राजकीय व सामाजिक प्रवासात मोलाची साथ देणारे हितचिंतक, वडीलधारी मंडळी, मित्रपरिवार, सहकारी, कार्यकर्ते तसेच पत्रकार बांधव यांचे विशेष आभार व्यक्त केले. सर्वांच्या विश्वासाच्या बळावर जनसेवा, विकास आणि संघटन बळकटीसाठी अधिक जोमाने कार्य करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. पांडूरंग माने यांच्या शिवसेना प्रवेशामुळे जामखेड तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, आगामी काळात शिवसेनेच्या संघटनात्मक कामाला अधिक बळ मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.

Loading

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page